Home बातम्या Motorola चा मोठा डाव, लॉन्च केले लो बजेट वाले Moto G10 आणि G30 स्मार्टफोन

Motorola चा मोठा डाव, लॉन्च केले लो बजेट वाले Moto G10 आणि G30 स्मार्टफोन

Motorola कंपनी भारतात 19 फेब्रुवारीला आपल्या ई-सीरीज मध्ये Moto E7 Power लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयारी दाखवली आहे. दुसरीकडे कंपनीने काल टेक मंचावर आपल्या G सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन Moto G10 आणि Moto G30 सादर केले आहेत. कंपनीने हे दोन्ही फोन सॉलिड कॅमेरा एक्सपीरियंस आणि मोठ्या बॅटरी लाइफसह मार्केट मध्ये आले आहेत. तसेच कंपनी येत्या काही आठवड्यांमध्ये फोन्स निवडक यूरोपियन मार्केट मध्ये लॉन्च करेल.

लुक व डिजाइन

दोन्ही फोनचा लुक जवळपास एकसारखा आहे. Moto G30 आणि Moto G10 बद्दल बोलायचे तर हे स्मार्टफोन्स ड्यूड्राॅप नाॅच डिस्प्लेवर लाॅन्च केले गेले आहेत. फोन्सच्या स्क्रीन तिन्ही बाजूंनी बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. मोटोरोलाचे हे फोन्स क्वाॅड रियर कॅमेऱ्यासह येतात. बॅक पॅनलवर डावीकडे चौकोनी आकारात असेल. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. पॅनलवर खालच्या बाजूला पण वर्टिकल शेप मध्ये Motorola ची ब्रँडिंग आहे त्याचबरोबर स्पीकर फिट केला गेला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरीसह लो बजेट मध्ये भारतात येत आहे Moto E7 Power, किंमत असेल 10,000 पेक्षा पण कमी

डिस्प्ले

डिजाइन प्रमाणेच दोन्ही फोन्सचे डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स पण एकसारखे आहेत. मोटो जी10 आणि मोटो जी30 मध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 x 1,600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. Moto G30 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि Moto G10 मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे.

प्रोसेसिंग पावर

फोनला पावर देण्यासाठी मोटो G30 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 देण्यात आला आहे जो 8 Kryo 260 CPU कोर (फोर बेस्ड ऑन A73, फोर ऑन A53) वर चालतो. चांगल्या ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एड्रिनो 610 जीपीयू देण्यात आला आहे. दुसरीकडे मोटो जी10 मध्ये Snapdragon 460 चिपसेट आहे जो फोनची किंमत कमी करतो.

कॅमेरा

दोन्ही फोन्स मध्ये कॅमेरा फीचर्स आणि सेंसर एकसारखे आहेत फक्त मेन सेंसरमध्ये फरक आहे. Moto G30 मध्ये मागे अपर्चर f/1.7 सह 64MP चा मेन सेंसर क्वाड पिक्सल टेकसह येतो. तर, Moto G10 मध्ये अपर्चर f/1.7 आणि नाइट विजनसह 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोन मध्ये 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा (118º) आहे. तसेच फोन मध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Moto चा हा लो बजेट फोन

रॅम व स्टोरेज

Moto G30 मध्ये 4GB आणि 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते. मोटो जी10 मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेजसह, 4जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट आहेत आणि मोटो जी30 प्रमाणे माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनची स्टोरेज वाढवता येते.

कनेक्टिविटी, बॅटरी आणि ओएस

दोन्ही 4जी फोन (कॅट 4) आहेत, ज्यांच्यात कनेक्टिविटी ऑप्शनसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, एनएफसी आणि अनेक सॅटेलाइट पोजिशनिंग सिस्टम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच वायर्ड कनेक्टिविटी मध्ये यूएसबी-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. पावर बॅकअपसाठी फोन्स मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस वापरता येते.

किंमत

दोन्ही Moto G10 आणि G30 प्लास्टिक बॉडी वॉटर-रिपेलेंट डिजाइनसह सादर केले गेले आहेत. डस्ट आणि वॉटर प्रूफसाठी फोन मध्ये IP52 रेटिंग आहे. किंमत पाहता Moto G10 ची किंमत €150 (जवळपास 13,000 रुपये) आणि G30 की किंमत €180 (जवळपास 15,000 रुपये) आहे.