19 फेब्रुवारीला लॉन्च होईल Moto चा हा लो बजेट फोन

Moto या आठवड्यात म्हणजे 19 फेब्रुवारीला भारतात E7 Power स्मार्टफोन लॉन्च करेल. याची माहिती कंपनीने ट्विट करून दिली आहे. काही दिवसांपासून ई-सीरीजचा हा फोन भारतात लॉन्च होणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आज स्वतः कंपनीने यावर शिक्कामोर्तब करत ट्विट केले आहे. इतकेच नव्हे तर Lenovo ची मालकी असलेल्या कंपनी मोटोरोलाने या फोनच्या काही स्पेसिफिकेशनचा खुलासा पण केला आहे, त्यावरून अंदाज लावला जात आहे कि मोटो ई7 पावर एक बजेट स्मार्टफोन असेल.

इथे होईल विक्री

Moto E7 Power ई-कॉमर्स साइट Flipkart वर 19 फेब्रुवारी दुपारी 12 वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा फोन सिंगल 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज कॉन्फिग्रेशनसह येईल. कंपनीने अजूनही फोनच्या किंमतचा खुलासा केला नाही.

हे देखील वाचा : लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62, यात आहे 7,000एमएएच बॅटरी आणि 64MP चा जबरदस्त कॅमेरा

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे कि हा फोन 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज सह 5,000 एमएएच बॅटरीसह येईल. तसेच यात सिक्योरिटीसाठी रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर पण दिला जाईल. इतकेच नव्हे तर मोटो ई7 पावर फोन मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले पण असेल. Motorola India च्या लेटेस्ट ट्वीट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिसला आहे.

काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता कि फोन मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट दिला जाईल. तसेच मोटो ई7 पावर डुअल रियर कॅमेरा सेटअपवर लाॅन्च केला जाईल. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल जी एक वाइड अँगल लेंस असेल. तसेच फोन मध्ये 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेंस असल्याचे सांगण्यात आले आहे जी एक मॅक्रो लेंस असेल. सेल्फी आणि वीडिया काॅलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

हे देखील वाचा : Exclusive: 12,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन Galaxy A12, जाणून घ्या खासियत

डिजाइन

अलीकडेच समोर आलेल्या Moto E7 Power च्या फोटोमधून खुलासा झाला होता कि फोन ड्यूड्राॅप नाॅच डिस्प्लेसह सादर केला जाईल. तसेच, या फोन मध्ये मागे डावीकडे वर्टिकल शेप मध्ये डुअल कॅमेरा असेल. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here