भारतात गेल्यावर्षी सर्वात स्वस्त 5जी फोन Moto G 5G लॉन्च केल्यानंतर अनेक दिवसांपासून बातमी समोर येत होती कि मोटोरोला आपल्या G-सीरीजमध्ये अजून एक स्वस्त 5G फोन घेऊन येण्याचा विचार करत आहे. आता कंपनीने सर्व लीक व बातम्यांना पूर्णविराम देत आपला नवीन 5G फोन Motorola Moto G50 5G सादर केला आहे. स्मार्टफोन सध्या कंपनीने यूरोपमध्ये लॉन्च केला आहे. भारतात या फोनच्या उपलब्धतेबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. (moto g50 5g launch with 5000mah battery 48mp camera know price specification)
Moto G50 ची डिजाइन
फोनमध्ये फ्रंटला सेल्फी कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. तसेच मागे फोनमध्ये वर्टिकल शेप ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या कॅमेरा मॉड्यूल वर “48MP QUAD PIXEL” लिहिण्यात आले आहे आणि सोबत LED फ्लॅश पण आहे. Motorola फोनमध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे, जो फोनच्या मागे Moto लोगो मध्ये आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे.
हे देखील वाचा : OPPO ने लॉन्च केला कमी किंमत असलेला 5G स्मार्टफोन Reno 5 Lite, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Moto G50 चा कॅमेरा
फोटोग्रफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी लेंससह एक 5 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कॅमेरा फीचर्स म्हणून फोनमध्ये एचडीआर, टाइमर, ऍक्टिव्ह फोटो, प्रो मोड, पोर्ट्रेट मोड, टाइमलॅप्स विडियोसह अनेक आणि ऑप्शन पण देण्यात आले आहेत.
Moto G50 चे स्पेसिफिकेशन्स
मोटो जी50 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये 1600×720 पिक्सल रेजॉलूशन असलेला 6.5 इंचाचा मॅक्स विजन एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. मोटो G50 मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे आणि हा फोन 64जीबी/128जीबीच्या इंटरनल स्टोरेज वेरियंटमध्ये येतो. जर तुम्ही फोनची स्टोरेज वाढवू इच्छित असाल तर माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने हि 1टीबीपर्यंत वाढवता पण येईल.
हे देखील वाचा : Samsung पुन्हा धमाल करण्याची तयारी, डबल फोल्डिंग स्मार्टफोन लवकरच करेल लॉन्च
फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये 3.5mm ऑडियो जॅक, टाइप-C पोर्ट, वाय-फाय 5GHz, ब्लूटूथ 5.0, 4G आणि एनएफसी सारखे ऑप्शन आहेत. तसेच हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो.
किंमत
Moto G50 काही दिवसांनी निवडक यूरोपीय बाजारांमध्ये विक्रीसाठी सादर केला जाईल. 4 / 64GB मॉडेलची किंमत 249.99 यूरो (जवळपास 21,000 रुपये) आहे. कंपनीने दुसऱ्या वेरिएंटच्या किंमतीचा खुलासा केला नाही. हा फोन अक्वा ग्रीन आणि स्टील ग्रे कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला गेला आहे.
