Samsung पुन्हा धमाल करण्याची तयारी, डबल फोल्डिंग स्मार्टफोन लवकरच करेल लॉन्च

Samsung दरवर्षी टेक मंचावर आपल्या दोन फ्लॅगशिप सीरीज Galaxy S आणि Galaxy Note लॉन्च करते. असे वाटत आहे कि कंपनी यावर्षी आपले गॅलेक्सी नोट सीरीज स्किप करून फोल्डेबल स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवण्याची तयारी करत आहे. Nikkei Asia च्या एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे कि सॅमसंग एक दोन नाही तर तीन नवीन फोल्डेबल फोनवर काम करत आहे. या तीन फोनमध्ये Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, आणि एक ‘double-folding’ डिवाइसचा समावेश असेल. इतकेच नव्हे तर सॅमसंगद्वारे हे तिन्ही फोन यावर्षीच्या शेवटी लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी 2021 मध्ये फोल्डेबल फोनची विक्री वाढवण्याचे लक्ष्य बनवत आहे.

एक नव्हे तर दोन वेळा फोल्ड होईल फोन

Nikkei च्या रिपोर्टमध्ये समोर आले आहे कि सॅमसंगने डबल हिंज डिजाइनसाठी अनेक पेटंट दाखल केले आहेत. त्याचबरोबर अशी पण माहिती मिळाली आहे कि या स्मार्टफोनचे डिटेल्स पण जवळपास फाइनल झाले आहेत. निक्केईच्या एका सोर्सनुसार या फोनचा अनफोल्ड स्क्रीन आस्पेक्ट रेश्यो 16: 9 किंवा 18: 9 सेट केला गेला आहे. ज्यामुळे युजर्स या फोनवर सहज व्हिडीओ गेम खेळात येतील आणि इतर ऍप्लिकेशन चालतील.

हे देखील वाचा : 16,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे Apple iPhone 11, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी, iPhone 12 mini वर पण आहे भरभक्कम डिस्काउंट

4G सह 5G वेरिएंट पण होईल लॉन्च

अपकमिंग गॅलेक्सी Z फ्लिपबद्दल बोलले जात आहे कि याला गॅलेक्सी Z Flip 2 किंवा Galaxy Z Flip 3 च्या नावाने (कारण Galaxy Z Flip 5G दुसऱ्या पिढीचा Galaxy Z Flip बोलले जात आहे) सादर केला जाईल. नवीन गॅलेक्सी झेड फ्लिप 4 जी आणि 5 जी वेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार सॅमसंग नवीन Z फ्लिप बजेट फ्लॅगशिप म्हणून सादर केला जाईल.

हे देखील वाचा : लो बजेट Nokia X20 5G लवकरच भारतात करेल एंट्री, लीकमध्ये झाला मोठा खुलासा

लक्षात असू द्या कि कंपनीद्वारे लॉन्च केल्या गेलेल्या फोल्डिंग फोन सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड आणि गॅलेक्सी Z फ्लिप दोन्हीमध्ये एकच हिंज आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंगने आपल्या एकूण फोल्डेबल स्मार्टफोन शिपमेंटला चालना देण्यासाठी यांच्या विक्रीसाठी एक लक्ष्य निर्धारित केले आहे. सॅमसंग वर्षाला गॅलेक्सी नोट सीरीजचे 10 मिलियन पेक्षा जास्त फोन विकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here