Motorola चे दोन नवीन स्मार्टफोन Moto G 5G आणि Moto G9 Power काही दिवसांपुवी भारतीय सर्टिफिकेशन्स साइट बीआईएस वर सर्टिफाइड झाले होते. या सर्टिफिकेशनवरून चर्चा सुरु झाली होती कि मोटोरोला हे दोन्ही स्मार्टफोन्स लवकरच भारतात लॉन्च करू शकते. आता एका टिपस्टरने दावा केला आहे कि मोटो जी 5जी आणि मोटो जी9 पावर लवकरच भारतीय बाजारात एंट्री करतील जे पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह हायएन्ड डिवायसेजना टक्कर देतील.
Moto G 5G आणि Moto G9 Power च्या इंडिया लॉन्चची माहिती टिपस्टर मुकुल शर्मानेदिली दी आहे. स्टफलिस्टिंग्स ट्वीटर हँडल वर ट्वीट करून टिपस्टरने दावा केला आहे कि मोटोरोलाचे हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केले जातील. पण स्मार्टफोन्सची लॉन्च डेट कोणती असेल हि माहिती अजून स्पष्ट झाली नाही. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन यूरोपियन मार्केट मध्ये आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता फोन्सच्या इंडिया लॉन्चच्या तारखेसाठी मोटोरोलाच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे. आशा आहे कि डिसेंबर मध्ये हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारात येतील.
Moto G 5G
मोटो जी 5जी मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.7 इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉइड 10 ओएस सह हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट वर चालतो जो 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. हा फोन यूरोप मध्ये 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. Moto G 5G पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 20वॉट फास्ट चार्जिंग फीचर सह येते. मोटो जी 5जी बाजारातील किफायतशीर 5G फोन्स पैकी एक आहे.
Moto G9 Power
मोटो जी9 पावर पाहता यात 720 × 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.8-इंचाचा एचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आली आहे. अँड्रॉइड 10 आधारित हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो. इंटरनेशन मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. आशा आहे कि भारतात पण हाच रॅम असलेला मॉडेल लॉन्च होईल.
फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि विडियो कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनची सर्वात मोठी खासियत यातील 6000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कंपनीचा दावा आहे कि यामुळे युजर्सना 60 तासांचा बॅकअप मिळेल.