4 जुलैला भारतात येत आहे फ्लिप फोन Moto Razr 50 Ultra, अ‍ॅमेझॉनवर होणार याची सेल

Motorola ने 25 जूनला Moto S50 Neo, Razr 50 आणि Razr 50 Ultra ला चिनी मार्केटमध्ये सादर केले होते. तसेच, आता ब्रँडने Razr 50 मॉडेलची भारतातील लाँचच्या तारखेवरून पडदा उठविला आहे. तसेच, Lenovo चे मालकी हक्क असलेली कंपनी Razr 50 Ultra पुढच्या महिन्यात July 4 ला भारतात सादर करेल. याची माहिती अ‍ॅमेझॉन इंडिया वेबसाईट एक डेडीकेटेड पेजच्या माध्यमातून समोर आली आहे. चला पुढे तुम्हाला फोन बाबत संपूर्ण माहिती माहिती देत आहोत.

Moto Razr 50 Ultra अ‍ॅमेझॉनवर झाला लिस्ट

जसे की आम्ही सांगितले आहे की मोटोरोला रेजर 50 अल्ट्राचे लँडिंग पेज अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. हा तीन पॅनटोन-क्यूरेटेड शेडमध्ये उपलब्ध होईल, ज्यात स्प्रिंग ग्रीन, पीच फज आणि मिडनाइट ब्लू. लँडिंग पेजवर सांगितल्या गेलेल्या स्पेसिफिकेशनवरून समजले आहे की भारतात येणारा रेजर 50 अल्ट्रा हा डिव्हाईस असेल जो अजून चीनमध्ये लाँच झाला आहे.

Moto Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन (चीन)

  • इनर डिस्प्ले: Motorola razr 50 ultra मोबाईलमध्ये 6.9-इंचाचा (2640×1080 पिक्सल) फ्लेक्सव्यू FHD+ pOLED LTPO डिस्प्ले आहे यावर 165Hz रिफ्रेश रेट, 10-बिट HDR 10+, 100% DCI-P3 कलर गॅमट, 3000 निट्स पर्यंतच्या अधिकतम ब्राईटनेस, डॉल्बी व्हिजन सारखे फिचर्स मिळतील.
  • आऊटर डिस्प्ले: याला आणि पण खास बनवित आहे याचा आऊटर डिस्प्ले कारण हा 4 इंचाचा (1272×1080 पिक्सल) क्विकव्यू pOLED LTPO सह आहे. जो 165Hz रिफ्रेश रेट, 100% DCI-P3 कलर गॅमट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन सह आला आहे.
  • चिपसेट: अल्ट्रा मॉडेलला ब्रँडने ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 4nm मोबाईल प्लॅटफॉर्म सह एंट्री दिली आहे. तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 735 GPU लावला आहे.
  • स्टोरेज: हा डिव्हाईस 12GB LPDDR5X RAM सह 256GB व 512GB UFS 4.0 इंटरनल स्टोरेज असलेला आहे.
  • कॅमेरा: Moto razr 50 ultra मध्ये 1/1.95″ सह 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि f/1.79 अपर्चर, OIS सह 50MP 2x टेलीफोटो कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: Motorola razr 50 ultra 4000mAh ची बॅटरीसह आहे. याला चार्ज करण्यासाठी 44W टर्बोपावर फास्ट आणि 15W वायरलेस चार्जिंग मिळत आहे.
  • इतर: मोटोरोला रेजर 50 अल्ट्रा मॉडेलमध्ये स्टीरियो स्पिकर, साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी एटमॉस, IPX8 रेटिंग, ड्युअल सिम 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.3 सारखी वैशिष्ट्ये आहेत.
  • बॅटरी: Motorola razr 50 ultra 4000mAh ची बॅटरीसह आहे. याला चार्ज करण्यासाठी 44W टर्बोपावर फास्ट आणि 15W वायरलेस चार्जिंग मिळते.
  • ओएस: दोन्ही razr 50 मॉडेल अँड्रॉईड 14 आधारित My UI 7.0 सह काम करतो.

Moto Razr 50 Ultra ची किंमत (अंदाजे)

मोटोरोला रेजर 50 अल्ट्राला चीनमध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज मध्ये 5,699 युआन म्हणजे जवळपास 65,470 चा आहे. तर 12GB रॅम + 512GB ची किंमत 6,199 युआन जवळपास 71,220 रुपयांमध्ये सादर केला गेला होता. यामुळे हा फोन भारतात पण या किंमतीच्या आसपास सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here