Home बातम्या पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights
  • हा फोन युरोपमध्ये लाँच झाला आहे.
  • यात Dimensity 8020 आहे.
  • फोनमध्ये 14 5G Bands देण्यात आले आहेत.

Motorola Edge 40 Pro काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. तर आता कंपनीनं या सीरीजचा वॅनिला मॉडेल Motorola Edge 40 देखील बाजारात आणला आहे. मोटोरोलानं आपला हा नवीन स्मार्टफोन युरोपीयन बाजारात सादर केला आहे ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

मोटोरोला एज 40 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 40 चा डिस्प्ले

Motorola Edge 40 मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. या डिस्प्लेवर 1200निट्स ब्राइटनेस आणि एचडीआर10+ सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच

Motorola Edge 40 चा प्रोसेसर

मोटोरोला एज 40 स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 8020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Motorola Edge 40 चा कॅमेरा

फोटोग्राफीसाठी मोटो एज 40 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.4 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा 1/1.5-इंच सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलची मॅक्रो व्हिजन अल्ट्रावाइड अँगल लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Motorola Edge 40 ची बॅटरी

पावर बॅकअपसाठी मोटोरोला एज 40 स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही वेगानं करण्यासाठी फोन 68वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. तसेच हा मोबाइल फोन 15वॉट वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीनुसार फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये हा फोन संपूर्ण दिवसाचा बॅकअप देऊ शकतो आहे. हे देखील वाचा: Oppo F23 5G भारतात लवकरच होऊ शकतो लाँच, फीचर्सचा झाला खुलासा

मोटोरोला एज 40 चे बेस्ट फीचर्स

  • Motorola Edge 40 मध्ये 14 5G Bands चा सपोर्ट मिळतो.
  • हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी आहे जी स्क्रीनच्या खाली आहे.
  • Moto Edge 40 आयपी68 सर्टिफाइड आहे त्यामुळे हा वॉटर व डस्ट रेजिस्टेंट बनतो.
  • फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉसद्वारे ट्यून्ड ड्युअल स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत.
  • मोटो एज 40 ची किंमत

    Motorola Edge 40 मार्केटमध्ये 8जीबी रॅम + 256जीबी मेमरीसह लाँच करण्यात आला आहे. याची किंमत €550 यूरो आहे जी भारतीय करंसीनुसार 49,499 रुपयांच्या आसपास आहे. युरोपीयन मार्केटमध्ये हा मोटोरोला फोन Nebula Green, Eclipse Black (both in vegan leather) आणि Lunar Blue (acrylic) ऑप्शनमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.