Mediatek Dimensity 7050 चिपसेटसह येईल Lava Agni 2 5G, मे मध्ये होऊ शकतो लाँच

Highlights

  • Lava Agni 2 5G लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाईल.
  • Lava Agni 2 5G सह मीडियाटेक Dimensity सीरीजचा प्रोसेसर मिळेल.
  • फोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळू शकते.

Lava Agni 2 5G च्या लाँच बद्दल गेल्या काही दिवसांपासून माहिती समोर आली आहे. तसेच अलीकडेच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाँचिंगचे संकेत दिले होते. आता कंफर्म झाला आहे की या अपकमिंग 5G फोनसह मीडियाटेक डायमेन्सिटी सीरीजचा प्रोसेसर मिळणार आहे. चला जाणून घेऊया या प्रोसेसर बाबत आणि फोनची माहिती.

शक्तीशाली मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसरसह होणार एंट्री

मीडियाटेकनुसार Lava Agni 2 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7050 चिपसेटसह लाँच केला जाईल. कंपनी सांगितलं आहे की मीडियाटेक हायपरइंजिन गेमिंग एन्हांसमेंटसह गेमर्ससाठी बनवण्यात आला आहे. यातून हाय-रेजोल्यूशन फोटोज घेता येतील आणि स्ट्रीमर्ससाठी शक्तीशाली मिराव्हिजन 4के एचडीआर व्हिडीओ प्रोसेसिंगमध्ये मदत मिळेल. हे देखील वाचा: Nothing Phone (2) चा लाँच कंफर्म; कंपनीनं सांगितलं काही येणार दमदार स्मार्टफोन

lava agni

मीडियाटेक डिमेन्सिटी 7050 चे फिचर

  • मीडियाटेक हायपर इंजिन
  • 200MP फोटोज आणि 4K HDR व्हिडीओ
  • Wi-Fi 6

नवीन MediaTek Dimensity 7050 इंटीग्रेटेड 5G HSR मोडसह येईल. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही काही सर्च कराल तेव्हा इंटरेनेट अडखळणार नाही. तर SoC मध्ये Arm Mali-G68 ग्राफिक्स इंजिन आणि octa-core CPU, 2.6GHz पर्यंत दोन Arm Cortex-A78 प्रोसेस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अ‍ॅप्स आणि गेमिंगचा चांगला अनुभव मिळेल.

Dimensity 7050 मध्ये युजर्सना 200MP मेन कॅमेरा आणि नॉयज रीडक्शन सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. 4K HDR व्हिडीओ कॅप्चर इंजिन देखील मिळेल. या चिपसेटसह फुल HD+ डिस्प्ले मिळेल जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा चिपसेट, 2×2 MIMO सपोर्टसह Wi-Fi 6 घेऊन येईल. म्हणजे तुमचं इंटरनेट कनेक्शन जास्त फास्ट होईल. तसेच Bluetooth 5 आणि GNSS सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळू शकतात.

लावा अग्नी 2 5जी ची लाँच डेट?

Lava Agni 2 5G फोनबद्दल कंपनीनं अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. परंतु रिपोर्टनुसार, हा फोन याच महिन्यात म्हणजे म्हणजे मे मध्ये इंडियन टेक मार्केटमध्ये येऊ शकतो.

लावा अग्नी 2 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक्स) >

  • 6.5” HD+ Display
  • 50MP Camera
  • 6GB RAM
  • 5000mAh Battery, 44W Fast Charging

Lava Agni 2 5G फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकते जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा लावा मोबाइल 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: Nokia XR21 rugged phone झाला लाँच; धूळ, पाणी, गर्मी आणि थंडीत देखील चालेल सुसाट

हा फोन 6जीबी रॅम व 8जीबी रॅम (वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी) सह सादर केला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here