Motorola Edge 50 Neo स्मार्टफोनच्या भारतीय लाँच तारखेची झाली पुष्टी, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

मोटोरोलाने भारतीय बाजारात आणखी एक एज सीरीजचा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा Motorola Edge 50 Neo नावाने लाँच केला जाईल. तुम्हाला सांगतो की याआधी या सीरीज अंतर्गत 4 मॉडेल्स आले आहेत. त्याचवेळी, 50 निओच्या संबंधित फ्लिपकार्टवर मायक्रोसाईट लाईव्ह झाली आहे. चला, पुढे त्याच्या लाँचिंग तारीख आणि त्यात मिळणाऱ्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Motorola Edge 50 Neo भारतातील लाँच तारखेची पुष्टी

  • ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर समोर आलेल्या टिझरनुसार, Motorola Edge 50 Neo हा 16 सप्टेंबर रोजी लाँच केला जाईल.
  • ब्रँडने पुष्टी केली आहे की डिव्हाईसमध्ये व्हेगन लेदर फिनिश डिझाईन पहायला मिळेल. हा फोन मिलिटरी ग्रेड IP68 MIL810H मिलिटरी ग्रेड सर्टिफाईड रेटिंगसह येईल.
  • फोनसाठी ग्राहकांना नॉटीकल ब्लू, लट्टे, ग्रिसेल आणि पॉईन्सियाना सारख्या रंगांचे पर्याय मिळतील.

Motorola Edge 50 Neo चे स्पेसिफिकेशन

  • 6.4 इंच एलटीपीओ डिस्प्ले
  • डायमेंसिटी 7300 चिपसेट
  • 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 50MP रिअर कॅमेरा
  • 32MP फ्रंट कॅमेरा
  • 4310mAh बॅटरी
  • 68W फास्ट चार्जिंग
  • IP68 रेटिंग
  • 5 ओएस अपग्रेड

डिस्प्ले: Motorola Edge 50 Neo स्मार्टफोन 6.4 इंचाच्या वाईड सुपर एचडी एलटीपीओ डिस्प्लेसह येतो. त्यावर 120 हर्ट्स रिफ्रेश रेट, 3,000 निट्स ची पीक ब्राईटनेस, 100 टक्के डीसीआय पी3 कलर गॅमट आणि 10-बिट कलर मिळतील. मोबाईलची स्क्रीन फ्लॅट ठेवली जाईल आणि कमीतकमी बेझल्ससह पंच होल कटआऊट असेल.

चिपसेट: फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डायमेंसिटी 7300 चिपसेट लावण्यात येईल. ज्याच्या मदतीने ग्राहकांना स्मूथ अनुभव मिळेल.

स्टोरेज आणि रॅम: Motorola Edge 50 Neo मध्ये ब्रँड द्वारे स्पीडसाठी 8 जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल.

कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Motorola Edge 50 Neo स्मार्टफोनमध्ये सोनी LYTIA 700C सेन्सरसह 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा पिक्सेल कॅमेरा असेल. यात 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा देखील मिळेल. एवढेच नाही तर फोनमध्ये एआय मॅजिक इरेजर, एआय फोटो अनब्लर आणि एआय मॅजिक एडिटर सारखे फिचर्स असतील. त्याचवेळी, डिव्हाईसच्या समोर 4K रेकॉर्डिंग क्षमता असलेला 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल.

बॅटरी: Motorola Edge 50 Neo मोबाईलमध्ये 4310mAh ची बॅटरी असेल. तिला चार्ज करण्यासाठी 15W वायरलेस चार्जिंग आणि 68W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाईल.

इतर: फोनमधील एआय स्टाईल सिंक आणि एआय मॅजिक कॅनव्हास सारखी वैशिष्ट्ये वॉलपेपर आणि इमेज तयार करण्यात मदत करतील. हा ड्युअल सिम 5G, वायफाय 6E, ब्लूटूथ 5.3, पाणी आणि धूळीपासून संरक्षित IP68 रेटिंग आदी फिचर्स ने सुसज्ज असेल.

ऑपरेटिंग सिस्टम: Edge 50 Neo हा मोबाईल अँड्रॉईड 14 वर आधारित असेल. यासोबतच 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि 5 ओएस अपग्रेड देखील मिळतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here