Motorola बाबत कालच आम्ही बातमी दिली होती कि कंपनी भारतात आपल्या ‘ई सीरीज’ चा नवीन फोन Moto E7 Plus लॉन्च करण्याची तयारी करत आहे. मोटोरोला इंडियाने हा फोन आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर टीज तर केला होता पण फोनच्या लॉन्चची माहिती दिली नव्हती. पण आज हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लिस्ट झाला आहे आणि त्याचबरोबर खुलासा झाला आहे कि मोटो ई7 प्लस येत्या 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल.
Moto E7 Plus बाबत मोटोरोला इंडियाने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन येत्या 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाईल. कंपनी हा फोन ऑनलाईन ईवेंटच्या माध्यमातून लॉन्च करेल जो 23 सप्टेंबर दुपारी 12 वाजता सुरु होईल. मोटो ई7 प्लस कंपनी वेबसाइट व्यतिरिक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि Moto E7 Plus याच शॉपिंग साइट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Moto E7 Plus
मोटोरोलाच्या या नवीन स्मार्टफोन मोटो ई7 प्लस बद्दल बोलायचे तर हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बॉडी पार्टशी जोडल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. कंपनीने हा फोन 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनने Amber Bronze आणि Navy Blue कलर मध्ये एंट्री घेतली आहे.
Get ready for the #UltimateCamera experience. With all-new #motoe7plus you can take your smartphone photography to the next level, even in low light. Launching 23rd September, 12 pm on @Flipkart! https://t.co/OYb654M9N2 pic.twitter.com/GVHnOTC9D1
— Motorola India (@motorolaindia) September 18, 2020
Moto E7 Plus ने अँड्रॉइड 10 ओएस सह मार्केट मध्ये आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 ला सपोर्ट करतो. ब्राजील मध्ये हा फोन 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येतील.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto E7 Plus डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनलच्या मधोमध चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Motorola Moto E7 Plus एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी मोटो ई7 प्लस मध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. मोटोरोलाने ब्राजील मध्ये Moto E7 Plus BRL 1,349 मध्ये लॉन्च केला आहे जे भारतीय करंसीनुसार 18,500 रुपयांच्या आसपास होतात.















