फ्लिप स्मार्टफोन Motorola Razr 50 च्या भारतातील लाँच तारखेची झाली पुष्टी, पाहा टिझर

मोटोरोलाने भारतात आपल्या Razr 50 सीरीजचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ब्रँडने यापूर्वी Motorola Razr 50 Ultra सादर केला होता. तर, आता पुढील महिन्यात Motorola Razr 50 येत आहे. कंपनीने सोशल मीडिया साईट्स आणि ॲमेझॉनवर याबाबतची माहिती दिली आहे. चला, पुढे या फ्लिप-स्टाईल फोल्डेबल स्मार्टफोनची लाँच तारीख आणि इतर तपशील जाणून घेऊया.

Motorola Razr 50 भारतीय लाँच तारीख

  • मोटोरोला भारतात 9 सप्टेंबर रोजी Motorola Razr 50 स्मार्टफोन लाँच करेल.
  • हा ॲमेझॉन इंडिया, मोटोरोला इंडिया ई-स्टोअर आणि प्रमुख रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असेल.
  • तुम्ही खालील सोशल मीडिया पोस्टमध्ये लाँचची तारीख पाहू शकता. ब्रँडने त्याच्या 3.6 इंचाच्या बाह्य स्क्रीनबद्दल देखील सांगितले आहे.
  • फोनच्या बाह्य स्क्रीनबद्दल असा दावा केला जात आहे की ही स्क्रीन सेगमेंटमधील सर्वात मोठी असेल.

Motorola Razr 50 ची वैशिष्ट्ये

  • ॲमेझॉनच्या सूचीनुसार Motorola Razr 50 चा डिस्प्ले 1700 निट्स पीक ब्राईटनेस, 100 टक्के DCI P3, SGS आय प्रोटेक्शन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण यांना सपोर्ट करेल.
  • मोटोरोला या स्मार्टफोनमध्ये जेमिनी तंत्रज्ञानाचा देखील समावेश करणार आहे. यामुळे या सेगमेंटमधील हा एकमेव फ्लिप फोन बनेल जो जेमिनी फिचरने सुसज्ज असेल.
  • कंपनीच्या म्हणण्यानुसार यूजर्स बाह्य स्क्रीनवर कोणतेही ॲप्लिकेशन वापरू शकतात. जे अंतर्गत स्क्रीन प्रमाणेच काम करेल.
  • Motorola Razr 50 फ्लिप फोन डेस्क मोडला देखील सपोर्ट करेल. ज्याच्या मदतीने नेव्हिगेट करणे सोपे होईल.
  • मोटोरोलाच्या या स्मार्टफोन मध्ये रिअर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. सोबतच रिअर कॅमेराच्या बाह्य स्क्रीनचा वापर करून सेल्फी घेण्याची संधी देखील मिळेल.
  • Moto Razr 50 व्हेगन लेदर फिनिश आणि वॉटर रेजिस्टंस साठी IPX8 रेटिंग देईल.
  • ब्रँडचा दावा आहे की फोनच्या मजबुतीसाठी 400,000 ते अधिक फोल्ड ची चाचणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here