Moto X50 Ultra चे स्पेसिफिकेशन आणि डिझाईन TENAA लिस्टिंगमध्ये आले समोर लवकर होऊ शकतो लाँच

मोटोरोला चीनमध्ये आपला नवीन मोबाईल Moto X50 Ultra लवकर लाँच करू शकतो. कंपनीने याबाबत काही दिवसांपूर्वी टिझर पण शेअर केला आहे. तसेच, लाँचची तारीख येण्याच्या आधी डिव्हाईला TENAA सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट करण्यात आले आहे. ज्यात याचे प्रमुख स्पेसिफिकेशन आणि डिझाईनची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लिस्टिंगची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Moto X50 Ultra डिझाईन TENAA लिस्टिंग

  • TENAA लिस्टिंग नुसार नवीन मोटोरोला स्मार्टफोन मॉडेल नंबर XT2401-2 सह स्पॉट झाला आहे. यात फोनच्या फोटोचा पण समावेश आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पाहू शकता की Moto X50 Ultra मध्ये कर्व एज आणि पंच-होल कटआऊट असेल.
  • फोनच्या बॅक पॅनलवर एक स्क्वायर मॉड्यूल आहे, जो वरती डावीकडे आहे. यात ट्रिपल कॅमेरा सेन्सर दिसत आहे. यातील एक पेरिस्कोप लेन्स आहे.
  • डिव्हाईसमध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटनला उजव्या साईडवर ठेवले जाईल.
  • कलर ऑप्शन पाहता मोटो एक्स 50 अल्ट्रा ब्लॅक कलरमध्ये दिसून आला आहे, परंतु लाँचच्या वेळी इतर पर्यायामध्ये पण पाहायला मिळेल.
  • लिस्टिंगनुसार फोनचे डायमेंशन 161.0 x 72.4 x 8.5 मिमी आणि वजन 197 ग्रॅम असल्याचे समोर आले आहे.

Moto X50 Ultra चे स्पेसिफिकेशन (संभावित)

  • डिस्प्ले: Moto X50 Ultra फोनमध्ये 2712 X 1220 पिक्सल रिजॉल्यूशनसह 6.67 इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • स्टोरेज: फोन अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. ज्यात 8GB,12GB, 16GB, 18GB रॅमसह 128GB, 256GB, 512GB आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • बॅटरी: लिस्टिंगवरून समजले आहे की फोनमध्ये 4,365mAh ची बॅटरी मिळेल, परंतु याला 4,500mAh ची बॅटरीसोबत आणले जाईल. तसेच 3C लिस्टिंगनुसार मोटो एक्स 50 अल्ट्रामध्ये 125W फास्ट चार्जिंग मिळू शकते.
  • प्रोसेसर: TENAA लिस्टिंगमध्ये चिपसेटची माहिती नाही, परंतु हा मोबाईल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 सह येऊ शकतो.
  • कॅमेरा: रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर, 50MP ची सेकंडरी लेन्स आणि 64MP चा तिसरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here