Home बातम्या एकच नंबर! सिंगल चार्जवर 100KM धावतील या 4 Electric Scooters; चार्जिंग टाइम देखील कमी

एकच नंबर! सिंगल चार्जवर 100KM धावतील या 4 Electric Scooters; चार्जिंग टाइम देखील कमी

New Electric Scooter Launch with 100km range price sale booking

New Electric Scooter Launch: सोलर प्रोडक्ट संबंधित कंपनी Exalta नं आपल्या Zeek सीरीजमध्ये चार New electric scooters भारतात लाँच केले आहेत. कंपनीनं नव्या Zeek series मध्ये सादर केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटी (Electric Two-Wheeler) ला Zeek 1X, Zeek 2X, Zeek 3X आणि Zeek 4X अशी नावे दिली आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर्सची प्राइस पाहता कंपनीच्या वेबसाइटवर या 99 हजार रुपये ते 1.15 लाख रुपयांपर्यंतच्या किंमतीत लिस्ट करण्यात आल्या आहेत. पुढे तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटर्सची रेंज, सेल आणि फीचर्सची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Electric Scooter Price

प्राइस पाहता कंपनीच्या साइटवर चारही इलेक्ट्रिक स्कूटर्स 20 टक्क्यापर्यंतच्या डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आल्या आहेत. वेबसाइटनुसार डिस्काउंट नंतर कंपनीच्या Zeek 1X ची किंमत 99,000 रुपये, Zeek 2X ची किंमत 1,05,000 रुपये आणि Zeek 3X ची किंमत 1,10,000 रुपये आहे. तसेच Zeek 4X ची किंमत 1,15,000 रुपये आहे. हे देखील वाचा: हुकमाचा एक्का काढणार Xiaomi! शक्तिशाली प्रोसेसरसह Redmi Note 12 लाँच करण्याची तयारी, पाहा भन्नाट फीचर्स

Exalta ZEEK 1X, Exalta ZEEK 2X आणि ZEEK 3X Electric Scooter

Zeek 1X ई-स्कूटर बद्दल बोलायचं झालं तर ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. तर, Exalta ZEEK 2X आणि ZEEK 3X Electric Scooter यापेक्षा थोड्या महाग आहेत. कंपनीनं या तिन्ही ईव्ही जवळपास एक सारख्या फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्ससह सादर केल्या आहेत. तसेच या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर LCD Meter, LED Light, USB Charger, 3 Speed Mode, parking Reverse, One Button Repair, Remove Key, Anti Theft Alarm आणि Wireless Controller फीचर्ससह बाजारात आल्या आहेत.

तिन्ही ई-स्कूटर Black, Red, Silver, White आणि Blue Gem कलरमध्ये विकत घेता येतील. ताई यात E-ABS (Electronic-Assisted Braking System With Regenerative Energy) देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये चार्जर सह 48/30 Lithium/Lead Acid बॅटरी आहे, जी चार्ज होण्यास 4-6 तासांचा वेळ लागतो. या एकदा चार्ज केल्यावर 70-80 Km पर्यंत वापरता येतात. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला नोकियाचा दणका! अत्यंत कमी किंमतीत 8 इंचाचा Nokia T10 LTE टॅबलेट

Exalta Zeek 4X Electric Scooter

Zeek 4X बद्दल बोलायचं तर ही कंपनीची सर्वात पावरफुल स्कूटर आहे. या स्कूटर मध्ये 48/30 लीथियम लेड अ‍ॅसिड बॅटरी देण्यात आली आहे जी 1.6 kWh पावर जेनरेट करते. तसेच हिच्यात एलसीडी मीटर, एलईडी लाइट, यूएसबी चार्जर, 3 स्पीड मोड, पार्किंग रिवर्स, वन बटन रिपेयर, रिमूव्ह की, अँटी थेफ्ट अलार्म वायरलेस कंट्रोलर आणि ई-एबीएस सारखे फीचर्स आहेत.

ही स्कूटर चार्ज करण्यास 4-6 तासांचा वेळ लागतो आणि जी फुल चार्जमध्ये 90-100 किमीची रेंज देते. तसेच यात 3 ड्राईव्ह मोड – इको, सिटी आणि टर्बो देण्यात आले आहेत. सोबत 12-इंचाचे टायर आणि डबल-ग्रेड सस्पेंशन मिळतं.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.