8 इंचाचा Nokia T10 LTE टॅबलेट भारतात लाँच

Nokia T10 LTE Tablet Launched India Price Specifications

Nokia ने भारतीय बाजारात एक नवीन आणि स्वस्त टॅबलेट सादर केला आहे. कंपनीनं काही आठवड्यांपूर्वी कंपनीनं Nokia T10 टॅबलेट भारतीय बाजारात लाँच केला होता. आता कंपनीनं या टॅबलेटचा नवीन एलटीई व्हर्जन म्हणजे Nokia T10 LTE नावाचा नवीन टॅब लाँच केला आहे. नवीन Nokia T10 LTE डिवाइसमध्ये आधी सादर करण्यात आलेल्या Nokia T10 प्रमाणेच फीचर्स देण्यात आले आहेत. परंतु याची खासियत म्हणजे नवीन डिवाइस LTE कनेक्टिव्हिटीसह येतो. म्हणजे तुम्ही यात सिमच्या मदतीनं इंटरनेटचा वापर करू शकाल. त्याचबरोबर टॅबमध्ये 8 इंचाचा डिस्प्ले, OZO ऑडियोसह स्टीरियो स्पिकर सेटअप देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Nokia T10 LTE Tablet ची किंमत आणि फीचर्सची माहिती.

Nokia T10 LTE Price

कंपनीनं Nokia T10 LTE Tab दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. ज्यात 3GB रॅम +32GB स्टोरेजची किंमत 12,799 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम व 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Nokia T10 LTE नोकिया स्टोर आणि अन्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 15 ऑक्टोबरपासून विकला जाईल. हे देखील वाचा: 521KM च्या अवाढव्य रेंजसह BYD Atto 3 Electric SUV ची भारतात एंट्री; युनिट्स संपण्याआधीच करा बुक

Nokia T10 LTE Tablet Launched India Price Specifications

Nokia T10 LTE Specifications

Nokia च्या या नवीन टॅबमध्ये 8 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 16:10 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 1280 × 800 पिक्सल रिजॉल्यूशन मिळतं. प्रोसेसर पाहता यात ऑक्टा-कोर UniSoC T606 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी माली G57 GPU देण्यात आला आहे.

बॅटरीच्या बाबतीत Nokia T10 LTE मध्ये 5250mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. टॅबलेटमध्ये चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट मिळतो. तसेच स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे. कॅमेरा फीचर्स पाहता टॅबमध्ये 8MP चा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 2MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: सावधान! 5G अपग्रेडच्या नावाखाली होतेय फसवणूक, अशाप्रकारे करा स्वतःचा बचाव

Nokia T10 LTE साठी युजर्सना ओशन ब्लू कलर मिळतो. डिवाइसचं वजन 375 ग्राम आहे आणि याचे डाइमेंशन 208 × 123.2 x 9 मिमी आहे. एक खास बाब म्हणजे टॅबलेट IPX2 रेटिंगसह येतो. हा टॅब अँड्रॉइड 12 वर चालतो. तसेच कंपनी पुढे दोन अँड्रॉइड व्हर्जन अपडेट आणि तीन वर्षांचे अँड्रॉइड सिक्योरिटी अपडेट देणार आहे, त्यामुळे लवकरच हा टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर अपडेट होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here