Homeबातम्याआता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर
आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर
Siddhesh Jadhav
Highlights
WhatsApp multi-device फीचर ऑफिशियली सादर झालं आहे.
याची अनाउंसमेंट Meta CEO Mark Zuckerberg नं Facebook वर केली आहे.
आता एकच व्हॉट्सअॅप अकाऊंट अनेक फोन्सवर एकत्र वापरता येईल.
असं म्हटलं जातं की भारतात ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे त्याच्याकडे व्हॉट्सअॅप नक्की मिळेल. आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी Meta देखील वेळोवेळी नवीन अपडेट व फीचर्स सादर करत असते जे अॅडव्हान्स तसेच उपयुक्त असतात. असंच एक नवीन WhatsApp Feature कंपनीनं सादर केलं आहे ज्यामुळे एकह व्हॉट्सअॅप अकाऊंट अनेक फोन्समध्ये एकाच वेळी वापरता येईल.
व्हॉट्सअॅपची मालकी असणाऱ्या टेक कंपनी मेटाचा सीईओ Mark Zuckerberg नं Facebook वर पोस्ट करत नवीन WhatsApp multi-device फिचर अधिकृतपणे सादर केलं आहे. हे फीचर अॅपच्या नवीन अपडेट मधून युजर्सना पाठवलं जाईल. कंपनीनुसार, आगामी काही दिवसांत हे नवीन फीचर व्हॉट्सअॅप युजर्सना मिळण्यास सुरुवात होईल. हे देखील वाचा: 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर
व्हॉट्सअॅप मल्टी-डिवायस फीचर म्हणजे काय आणि कसं वापरायचं?
या नवीन फीचरची खासियत म्हणजे याच्या माध्यमातून एकच WhatsApp account अनेक वेगवेगळ्या मोबाइल फोन्समध्ये वापरता येईल.
हे फीचर फक्त स्मार्टफोनच नव्हे तर व्हॉट्सअॅप वेब ब्राउजर, टॅबलेट आणि कम्प्यूटर्सवर देखील वापरता येईल.
सर्व डिवायसवरील व्हॉट्सअॅप अकाऊंटमधील सर्व मेसेज, मीडिया व कॉल्स एंड-टू-एंट एन्क्रिप्टेड असतील.
दोन फोन बाळगणाऱ्या लोकांसाठी हे फीचर सर्वाधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे एका डिवायसवर व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी दुसऱ्यातून लॉग आऊट करावं लागणार नाही.
WhatsApp multi-device फीचरमुळे एकच मोबाइल नंबरच्या माध्यमातून अनेक फोन्सवर व्हॉट्सअॅप वापरता येईल. हे फिचर बिजनेस ग्रुप्समध्ये देखील वापरता येईल.