Nokia 2.2 झाला भारतात लॉन्च, हा आहे कंपनीचा सर्वात स्वस्त वॉटरड्रॉप नॉच आणि एंडरॉयड वन ओएस असलेला फोन

Nokia ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी 6 जूनला भारतात एक ईवेंट आयोजित करेल आणि या मंचावरून कंपनीचा नवीन फोन सादर केला जाईल. Nokia ने आज या ईवेंट मध्ये कंपनीचा नवीन डिवाईस Nokia 2.2 लॉन्च केला आहे. Nokia 2.2 इंडियन बाजारात उतरवण्यासोबतच कंपनीने या फोनचा ग्लोबल लॉन्च पण केला आहे. Nokia 2.2 कंपनीचा सर्वात स्वस्त वॉटरड्रॉप नॉच आणि एंडरॉयड वन ओएस आधारित स्मार्टफोन आहे जो येत्या 10 जून पासून देशात सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाईन
Nokia 2.2 कंपनीने ट्रेंड मधील वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला आहे. फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत पण खालच्या बाजूस बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे ज्यावर Nokia ची ब्रॅण्डिंग आहे. फोनचा बॅक पॅनल ग्लॉसी लुक वाला आहे. Nokia 2.2 च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो बॅक पॅनल वर मधोमध आहे. कॅमेरा सेंसरच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला स्पीकर आहे. Nokia 2.2 च्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट आहे. त्याचप्रमाणे फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आले आहेत तर डाव्या पॅनल वर गूगल असिस्टंट बटण पण आहे.

स्पेसिफिकेशन्स
Nokia 2.2 कंपनी द्वारा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 5.71-इंचाच्या एचडी+ ऐज-टू-ऐज डिस्प्लेला सपोर्ट करतो. नोकियाचा हा नवीन फोन एंडरॉयड वन ओएस वर सादर केला गेला आहे जो एंडरॉयड 9 पाई आधारित आहे. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट देण्यात आला आहे.

कंपनीने Nokia 2.2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम मेमरी सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

Nokia 2.2 च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर या फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

नोकियाचा हा फोन 4जी ला सपोर्ट करतो ज्यात डुअल सिम, ब्लूटूथ, वाईफाई व ओटीजी सारखे कनेक्टिविटी फीचर्स आहेत. कंपनीने या फोन मध्ये कोणताही फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर दिला नाही. फोन अनलॉकिंग साठी Nokia 2.2 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत आणि उपलब्धता
Nokia 2.2 चा जीबी रॅम आणि 16जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनी द्वारा 7,699 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,699 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. तसेच कंपनी आपल्या यूजर्सना येत्या 30 जून पर्यंत या फोनचा 2जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये उपलब्ध करवून देईल. म्हणजे 30 जून नंतर किंमत 600 रुपयांनी वाढेल.

हा फोन आज म्हणजे 6 जून पासून 10 जून पर्यंत प्री-बुकिंग साठी उपलब्ध होईल ज्यांनंतर Nokia 2.2 टंग्स्टन ब्लॅक आणि स्टील कलर वेरिएंट मध्ये ऑफलाइन रिटेल स्टोर्स सोबत कंपनीच्या वेबसाइट वर ऑनलाइन शॉपिंग फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. तसेच Nokia 2.2 च्या खरेदीवर Jio यूजर्सना 2,200 रुपयांचा कॅशबॅक बेनिफिट आणि 100जीबी अतिरिक्त डेटा पण मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here