Home Featured लॉन्च झाला नोकिया 8110 4जी बनाना फोन, सोबत आहे 544जीबी 4जी डेटा मोफत

लॉन्च झाला नोकिया 8110 4जी बनाना फोन, सोबत आहे 544जीबी 4जी डेटा मोफत

यावर्षी फेब्रुवारीमध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉन्ग्रेस मध्ये नोकिया ने 8110 बनाना फोन सादर केला आहे. हा फोन 22 वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या कंपनीच्या यशस्वी फोन पैकी एक नोकिया 8110 मॅट्रिक्स चा अपग्रेड वर्जन होता. लॉन्चच्या वेळी कंपनीने माहिती दिली होती कि काही महिन्यात हा फोन ​भारता सह जगभरात अनेक ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच ऑगस्ट मध्ये 91मोबाइल्सने एक एक्सक्लूसीव माहिती दिली होती ज्यात सांगण्यात आले होते कि सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑकटोबरच्या सुरवातीला हा फोन भारतात लॉन्च होईल आणि आज कंपनीने हा जगासमोर आणला आहे. नोकिया 8110 4जी बनाना फोन भारतात लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 5,999 रुपये आहे आणि हा फोन 24 ऑकटोबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

तुम्हाला तर माहितीच आहे कि हा एक फीचर फोन आहे जो काई ओएस वर चालतो. पर फोनची बॉडी पॉलीकार्बोनेट पासून बनलेली आहे जी मागच्या बाजूला कर्व्ड आहे. यामुळेच एक बनाना फोन नाव देण्यात आले आहे. तसेच फोन मध्ये आल्फान्यूमेरिक कीपॅड देण्यात आला आहे जो स्लाइडर कवरच्या खाली लपलेला आहे. स्लाइडर बाजूला करताच फोनची स्क्रीन एक्टिव होते. जुन्या नोकिया 8110 मॅट्रिक्स मध्ये मोनोक्रोम स्क्रीन होती. पण यावेळी रंगीत स्क्रीन आणि ऍप्स पण फोन वर वापरता येतील. हा फोन पिवळ्या रंगात उपलब्ध आहे.

कपंनीचे म्हणेन आहे कि 8110 4जी मध्ये तुम्हाला गूगल ऍप्स मिळतील. या फोन वर सोशल ऍप जसे कि— फेसबुक आणि ट्विटर इत्यादी वापरता येतील. 4जी आधारित या फोन मध्ये ऍप स्टोर वरून ऍप्स डाउनलोड करू शकता आणि नोकियाचा प्रसिद्ध स्नेक गेम पण यात आहे.

स्पेसिफिकेशन पाहता नोकिया 8110 4जी मध्ये 2.4—इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 205 वर चालतो आणि यात 1.1गीगाहट्र्ज चा डुअल कोर प्रोसेसर मिळेल. कंपनी ने हा काई ओएस वर सादर केला आहे जो सध्या जियोफोन मध्ये पण उपलब्ध आहे.

फोनला 512एमबी रॅमची ताकद देण्यात आली आहे तसेच स्टोरेज साठी 4जीबी इंटरनल मेमरी आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी साठी 2एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच वीजीए रेजल्यूशन वाला फ्रंट कॅमेरा पण यात मिळेल. फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आणि तुम्ही 4जी सोबत वाईफाई आणि ब्लूटूथ वापरू शकता.तसेच चर्जिंग आणि डेटा ट्रांसफर साठी यूएसबी 2.0 आहे. पावर बॅकअप साठी 1,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे कि हा फोन दोन दिवसांचा पावर बॅकअप देऊ शकतो.

नोकिया 8110 4जी जियो इंटीग्रेशन सह येतो, यात तुम्हाला 544जीबी 4जी डेटा मोफत मिळेल. त्याचबरोबर गूगल मॅप्स, एफएम रेडियो आणि मीडिया प्लेयर पण मिळतील.