Home बातम्या Nokia G42 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात

Nokia G42 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात

Highlights
  • फोन डच रिटेल साइटवर स्पॉट झाला आहे.
  • जुलै मध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
  • ह्यात Snapdragon 480+ मिळू शकतो.

नोकिया ब्रँड अंतगर्त लवकरच एक नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G लाँच होऊ शकतो. कंपनीनं मात्र अधिकृतपणे ह्या फोन संबंधित घोषणा केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नोकिया जी42 5जी प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हा 5जी नोकिया फोन पुढील महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकतो.

Nokia G42 5G प्राइस

नोकिया जी42 5जी फोन Fotex नावाच्या डच रिटेल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला होता जो Nokiamob.net नं स्पॉट केला आहे. इथून नोकिया मोबाइलची संपूर्ण माहिती समोर आली आहे त्यानुसार जी42 5जी ची किंमत DKK 1,999 आहे. जी भारतीय करंसीनुसार 24,000 रुपयांमध्ये रूपांतरित होते. रिटेल साइटवर फोन Meteor Grey आणि Lavender कलरमध्ये दिसला होता, जोडीला 3 वर्षांची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी देखील मिळत होती.

Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स