नोकिया ब्रँड अंतगर्त लवकरच एक नवीन स्मार्टफोन Nokia G42 5G लाँच होऊ शकतो. कंपनीनं मात्र अधिकृतपणे ह्या फोन संबंधित घोषणा केली नाही परंतु एका ताज्या लीकमध्ये लाँचपूर्वीच नोकिया जी42 5जी प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हा 5जी नोकिया फोन पुढील महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकतो.
Nokia G42 5G प्राइस
नोकिया जी42 5जी फोन Fotex नावाच्या डच रिटेल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला होता जो Nokiamob.net नं स्पॉट केला आहे. इथून नोकिया मोबाइलची संपूर्ण माहिती समोर आली आहे त्यानुसार जी42 5जी ची किंमत DKK 1,999 आहे. जी भारतीय करंसीनुसार 24,000 रुपयांमध्ये रूपांतरित होते. रिटेल साइटवर फोन Meteor Grey आणि Lavender कलरमध्ये दिसला होता, जोडीला 3 वर्षांची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी देखील मिळत होती.
Nokia G42 5G स्पेसिफिकेशन्स
- 6.56″ HD+ display
- Snapdragon 480+
- 6GB RAM + 128GB Storage
- 50MP Rear Camera
- 20W 5,000mAh Battery
- स्क्रीन: नोकिया जी42 5जी फोनमध्ये 720 × 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.56 इंचाचा एचडी+ नॉच डिस्प्ले दिली जाऊ शकतो जोडीला गोरिल्ला ग्लास 3 तसेच 560निट्स ब्राइटनेस देखील मिळेल.
- प्रोसेसर: रिपोर्टनुसार हा नोकिया स्मार्टफोन 8नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जोडीला अॅड्रेनो 619 जीपीयू मिळेल.
- मेमरी : Nokia G42 5G फोन दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो. ह्यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमचा समावेश केला जाऊ शकतो. फोनमध्ये 128जीबी यूएफएस 2.1 स्टोरेज दिली जाऊ शकते.
- कॅमेरा: फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्सचा समावेश केला जाऊ शकतो. फ्रंटला 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो.
- बॅटरी: पावर बॅकअपसाठी ह्या नोकिया फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. जोडीला 20वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखी दिली जाऊ शकते.
- इतर फीचर्स: या फोनमध्ये IP52 रेटिंग, 3.5एमएम जॅक, एफएम रेडियो, 5G SA/NSA आणि Dual 4G VoLTE सारखे फीचर्स मिळू शकतात.