स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कंपन्या अनेक मार्गांचा अवलंब करतात. यातील काही मार्ग बेकायदेशीर असतात आणि आता अशाच एका प्रकारातून चीनी स्मार्टफोन ब्रँड OPPO अडकला आहे. फिनलँडच्या मोबाइल ब्रँड Nokia नं ओप्पो विरोधात केस केली आहे जी आस्ट्रेलियामध्ये सुरु आहे. याआधी देखील नोकिया कंपनीनं जर्मनीमध्ये OnePlus आणि ओप्पोला केसमध्ये हरवलं आहे त्यामुळे त्या देशात या दोन्ही ब्रँड्सच्या प्रोडक्टच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
Oppo च्या विरोधात Nokia नं केली केस
रिपोर्टनुसार, नोकिया कंपनीनं चीनी ब्रँड ओप्पोच्या विरोधात आस्ट्रेलियाच्या कोर्टात खटला दाखल केला आहे. Nokia SEP (Service Enablement Platform) चं उल्लंघन केल्याप्रकरणी OPPO विरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे. ओप्पोनं Nokia 4G आणि 5G technologies चा वापर कंपनीची परवानगी न घेता केला आहे. म्हणजे ओप्पोच्या स्मार्टफोन्समध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली जात आहे त्याचे मालकी हक्क नोकिया कंपनीकडे आहेत परंतु त्यांच्या परवानगीविना ओप्पो त्या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. हे देखील वाचा: 10 हजारांच्या बजेटमध्ये सुंदर स्मार्टफोन; 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह Infinix Hot 20 4G लाँच
नोकियाने का केली ओप्पोवर केस
मिळालेल्या माहितीनुसार साल 2018 मध्ये फिनलँडची कंपनी Nokia आणि चिनी कंपनी OPPO (Part of BBK Electronics) मध्ये एक लायसन्स अॅग्रीमेंट झालं होतं, त्यानुसार नोकियाद्वारे डेव्हलप करण्यात आलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर ओप्पो प्रोडक्ट्समध्ये केला जाऊ शकतो. साल 2021 मध्ये हे लायसन्स एक्सपायर झालं परंतु ते पुन्हा रिन्यू न करता ओप्पो कंपनी नोकियाची टेक्नॉलॉजी वापरत आहे. कोणत्याही नवीन लायसन्स अॅग्रीमेंटविना नोकियाची टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे ओप्पो विरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे.
जर्मनीमध्ये बॅन झाले आहेत OPPO Smartphones
आस्ट्रेलियाच्या आधी जर्मनीमध्ये देखील नोकिया कंपनीनं OPPO आणि OnePlus वर खटला दाखल केला आहे जिथे कोर्टानं या दोन्ही ब्रँड्सना दोषी ठरवत ओप्पो आणि वनप्लस स्मार्टफोन जर्मनीमध्ये बॅन केले आहेत. या बॅनमुळे चीनी कंपन्यांना जोरदार धक्का बसला होता आणि आगामी काळात आस्ट्रेलियामध्ये देखील ओप्पो मोबाइल्सवर बंदी घातली जाऊ शकते. हे देखील वाचा: जियो युजर्सना मोठा धक्का; न सांगता बंद केले अनेक लोकप्रिय प्लॅन्स, तुमचा प्लॅन तर नाही ना या यादीत?
नोकियानं ओप्पो आणि वनप्लस या दोन्ही कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये जी 5जी टेक्नॉलॉजी वापरली जात आहे तिचं पेटंट फक्त नोकियाकडे आहे. OPPO आणि OnePlus कंपनी Nokia ची 5G technology परवान्याविना वापरत आहेत, असा आरोप नोकियानं केला होता. म्यूनिक कोर्टानं या प्रकरणात ओप्पो आणि वनप्लसला दोषी करार केलं आहे. त्यामुळे आता या चीनी कंपन्या जर्मनीमध्ये आपले स्मार्टफोन विकू शकणार नाहीत.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
