Home बातम्या Nokia T21 टॅबलेट भारतात झाला लाँच, मोठी स्क्रीनसह 8,200mAh ची दणकट बॅटरी

Nokia T21 टॅबलेट भारतात झाला लाँच, मोठी स्क्रीनसह 8,200mAh ची दणकट बॅटरी

Highlights
  • Nokia T21 टॅबलेटची भारतात एंट्री
  • 8,200mAh ची बॅटरी आणि मोठा डिस्प्ले
  • नोकियाच्या नव्या टॅबची किंमत 20 हजारांपेक्षा कमी

स्मार्टफोन ब्रँड Nokia नं गेल्यावर्षी Nokia T21 टॅबलेट ग्लोबली सादर करण्यात आला होता. आता कंपनीनं हा दमदार टॅबलेट भारतात लाँच केला आहे. या टॅबमध्ये 2K रिजोल्यूशन असलेल्या मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच यात ड्युअल स्पिकर, 8,200mAh मोठी बॅटरी, 10.36 इंचाचा डिस्प्ले आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या नोकियाच्या नवीन टॅबची किंमत व स्पेसिफिकेशनची माहिती.

Nokia T21 चे स्पेसिफिकेशन्स

नोकियाचा नवीन टॅबलेट 10.36 इंचाच्या LCD पॅनलसह येतो, ज्याचे रिजोल्यूशन 1200 x 2000 पिक्सल, अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 5:3 आणि पीक ब्राइटनेस 360 निट्स आहे. यात Widevine L1 सह Wacom WGP आणि Wacom Active ESE 2.0 स्टाइलस सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीनं सांगितलं आहे की यात ऑल मेटल बॉडी देण्यात आली आहे तसेच यात अँटेनासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. कंपनीनं 60 टक्के रिसायकल मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: OPPO Reno 8T 4G चे फोटोज लीक; डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्सचा लाँचपूर्वीच खुलासा

नोकियाच्या नव्या टॅबमध्ये LED फ्लॅश लाइटसह फ्रंट व मागे 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. यात शानदार साउंडसाठी ड्युअल स्टीरियो स्पिकर देण्यात आले आहेत. तसेच टॅबमध्ये Kids स्पेससह वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडियो जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे ऑप्शन मिळतात. नोकियाचा नवीन टॅबलेट 8,200mAh ची मोठी बॅटरी असेल. तसेच 18W चा चार्जरनं चार्ज केला जाऊ शकतो. ही टॅब फुल चार्जमध्ये तीन दिवस चालेल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

नोकिया टी21 मध्ये प्रोसेसिंगसाठी Unisoc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा टॅबलेट 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. तसेच हा टॅब Android 12 OS वर चालतो. कंपनीनं या टॅबलेटला पुढील तीन वर्ष सॉफ्टवेयर अपडेट देण्याचा दावा केला आहे. हे देखील वाचा: 11 हजारांच्या आत मिळतोय 5G Phone; फक्त तीन दिवस आहे जबरदस्त ऑफर

किती आहे किंमत

Nokia T21 टॅबलेटची किंमत 17,999 रुपये आहे. हा डिवाइस ग्राहकांसाठी फक्त Charcoal Grey कलरमध्ये उपलब्ध आहे. या कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल. Nokia T21 Wi-Fi आणि 4G व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.