OPPO Reno 8T 4G चे रेंडर फोटोज लीक, डिजाईनचा लाँचपूर्वीच खुलासा

Highlights

  • OPPO Reno 8T 4G आणि 5G दोन मॉडेल्समध्ये लाँच होऊ शकतात
  • रेनो 8टी 4जी ची रेंडर ईमेज लाँचपूर्वीच समोर
  • पंच-होल स्क्रीन सह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
  • OPPO Reno 8T 4G मध्ये हीलियो जी99 प्रोसेसर

ओप्पो कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘रेनो’ सीरीजचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. कंपनी भारतात सध्या OPPO Reno 9 लाँच करण्याचा विचार करत नाही आणि देशात OPPO Reno 8T फोन घेऊन येऊ शकते. ओप्पोनं रेनो 8टी बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु नवीन लीकमध्ये या मोबाइल फोनची रेंडर ईमेज लीक झाली आहे. पुढे या फोटोजच्या डिटेल्ससह स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोनबद्दल चर्चा आहे की Reno 8T 4G आणि Reno 8T 5G दोन मॉडेल मार्केटमध्ये येऊ शकतात.

OPPO Reno 8T 4G ची डिजाईन

टिपस्टर इवान ब्लासनं हे फोटोज शेयर केले आहेत जो ओप्पो रेनो 8टी 4जी मॉडेल असल्याचं सांगण्यात आलं आहे. फ्रंट पॅनलवर फ्लॅट पंच-होल स्क्रीन दिली जाऊ शकते ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल वरच्या बाजूला डावीकडे दिला जाऊ शकतो. होल बॉडी एजपासून थोडा दूर असू शकतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिला जाऊ शकतो.

OPPO Reno 8T 4G चा बॅक पॅनल लेदर फिनिशसह येऊ शकतो. इथे वरच्या बाजूला डावीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो ज्यात दोन मोठे रिंग वर्टिकली दिले जाऊ शकतात. वरच्या रिंग मध्ये सिंगल कॅमेरा लेन्स तर खालच्या रिंगमध्ये दोन कॅमेरा सेन्सर आणि एक फ्लॅश लाईट मिळू शकते. रियर पॅनलवरचा खाली डावीकडे कंपनीची ब्रँडिंग मिळू शकते.

रेनो 8टी 4जी फोनच्या उजव्या पॅनलवर पावर बटन तर डाव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि सिम स्लॉट मिळू शकतो. फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप सी पोर्ट, ज्याच्या एक बाजूला 3.5एमएम जॅक तर दुसरीकडे स्पिकर ग्रिल मिळू शकते. लीक झालेल्या फोटोजमध्ये फोन आरेंज आणि ब्लॅक कलर दाखवण्यात आले आहेत.

OPPO Reno 8T 4G चे लीक स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा ओप्पो मोबाइल मीडियाटेक हीलियो जी99 प्रोसेसरसह मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच लीकनुसार, ओप्पो रेनो 8टी 4जी मॉडेल 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो. फोनचे इतर डिटेल्स व लाँच संबंधित माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट पाहिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here