Nothing नं आपल्या पहिल्या फोल्डेबल फोनचा रेंडर टीज केला आहे. नथिंगनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आगामी फोल्डेबल स्मार्टफोनचा रेंडर शेयर केला आहे, या रेंडरमधून फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे ही डिजाईन Samsung च्या फोल्डेबल फोन सारखीच दिसत आहे. त्यामुळे आता सॅमसंग, शाओमी, ओप्पो, विवो आणि गुगलनंतर नथिंग देखील फोल्डेबल सेगमेंटमध्ये उतरणार असं दिसतंय. परंतु आपल्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये नथिंग आपला सिग्नेचर ट्रान्सपरंट लूक देखील देऊ शकते.
नथिंग फोल्ड (1) ची डिजाईन
Nothing Fold (1) नावानं येणाऱ्या या फोल्डेबल फोनचा रेंडर समोर आला आहे. कंपनीनं आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की ब्रँड आपल्या कम्युनिटी मेंबर्स आणि फॅन्ससाठी सतत नवीन इनोवेशन घेऊन येत आहे. हे रेंडर देखील नथिंगच्या कम्युनिटी मेंबरकडून आले आहेत. हे देखील वाचा: Realme 11 Pro+ 5G गीकबेंचवर लिस्ट; MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच
Introducing Fold (1).
The latest innovation from our community member @3DPrintedCat.
We're always looking for fresh ideas and perspectives, and our Discord community is the perfect place to share yours. Join us at https://t.co/ZzWekUWUxL and be a part of the conversation! pic.twitter.com/QhL7VpLRP7
— Nothing (@nothing) May 1, 2023
शेयर करण्यात आलेल्या रेंडरमध्ये या फोल्डेबल फोनची डिजाईन Samsung Galaxy Z Fold सारखी दिसत आहे, ज्यात हिंजवर नथिंगची ब्रँडिग दिसत आहे. फोनची फोल्डेबल स्क्रीन ब्राइट आहे आणि याच्या हिंज दरम्यान गॅप फोल्डेबल स्क्रीनवर दिसत नाही. परंतु वास्तविक फोनची डिजाइन थोडी वेगळी असू शकते.
मिळू शकतात खास फीचर्स
Nothing Phone (1) प्रमाणेच या फोल्डेबल फोनमध्ये देखील ट्रान्सपरंट बॉडीचा वापर केला जाऊ शकतो. नथिंगनं आतापर्यंत लाँच झालेल्या सर्व डिवाइसेजमध्ये ट्रान्सपरंट बॉडी एलिमेंटचा वापर केला आहे. तसेच फोल्डेबल फोनमध्ये देखील Glyph लाइटिंगचा वापर केला जाऊ शकतो, जी नोटिफिकेशनच्या वेळी ब्लिंक करेल. तसेच यात वायर्डसह वायरलेस चार्जिंग, AMOLED फोल्डेबल स्क्रीन, ड्युअल कॅमेरा सारखे फीचर्स मिळू शकतात. हे देखील वाचा: PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार
कधी येतोय नथिंग फोल्ड (1) बाजारात?
नथिंग ब्रँडनं आपल्या ट्विटर हँडलवरून कंपनीच्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनची जास्त माहिती दिली नाही. कंपनीनं हा स्मार्टफोन Nothing Fold (1) नावानं बाजारात येईल हे सांगितलं आहे. परंतु अंदाज लावला जात आहे की हा फोन यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी बाजारात येऊ शकतो. सध्या कंपनी Nothing Phone (2) वर काम करत आहे.
