Realme 11 Pro+ 5G गीकबेंचवर लिस्ट; MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच

Highlights

  • Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन चीनमध्ये 10 मेला लाँच होऊ शकतो.
  • रियलमीचा हा फोन नवीन डिजाइन आणि MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह येऊ शकतो.
  • हा फोन 200MP कॅमेरा आणि 120Hz रिफ्रेश रेट कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह येऊ शकतो.

रियलमी लवकरच आपला प्रीमियम स्मार्टफोन Realme 11 Pro+ 5G को चीनमध्ये 10 मेला लाँच करेल. कंपनी आपल्या अपकमिंग स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स सतत टीज करत आहे. रियलमीचा हा फोन नवीन डिजाइन आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. फोनमध्ये 120Hz कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि पंच होल कटआउट मिळेल. आता रियलमीचा हा फोन गीकबेंच लिस्टिंगवर स्पॉट करण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

रियलमी 11 प्रो प्लस 5जी गीकबँच

Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity प्रोसेसरसह लाँच होईल, ज्याचा मॉडेल नंबर MT6877V/TTZA आहे. हा मीडियाटेकचा Dimensity 1080 SoC आहे, जो कंपनीनं Dimensity 7050 SoC नावानं रिब्रँड केला आहे. हे देखील वाचा: POCO F5 ची किंमत लाँचपूर्वीच आली समोर; 9 मेला होणार भारतात एंट्री

गीकबँच लिस्टिंगनुसार, नवीन चिपसेटमध्ये दोन Arm Cortex-A78 परफॉर्मन्स कोर आहेत, जे 2.6GHz वर क्लॉक करण्यात आले आहेत. तसेच सहा एफिशियंसी कोर आहेत, जे 2.0GHz वर क्लॉक करण्यात आले आहेत. हा फोन Mali-G68 MC4 GPU सह येईल. त्याचबरोबर गीकबँचच्या सिंग कर आणि मल्टी कोर टेस्ट पाहता आगामी 11 Pro+ 5G स्मार्टफोनला अनुक्रमे 838 आणि 2302 स्कोर मिळाला आहे.

रियलमी 11 प्रो प्लस 5जी स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : 6.7-इंचाचा कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले पॅनल, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 120Hz मिळू शकतो.

प्रोसेसर : रियलमीचा हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 7050 प्रोसेसरसह लाँच होईल.

रॅम आणि स्टोरेज : लीक रिपोर्ट्सनुसार, रियलमीचा हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. हा फोन अनेक व्हेरिएंट्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

ऑपरेटिंग सिस्टम : अपकमिंग रियलमी 11 प्रो प्लस स्मार्टफोन लेटेस्ट Android 13 आधारित कंपनीच्या Realme UI 4.0 वर चालेल.

कॅमेरा: फोटोग्राफी पाहता या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. जोडीला फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

बॅटरी : रियलमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग मिळू शकते. हे देखील वाचा: Realme GT Neo 3T वर मोठा डिस्काउंट; फ्लिपकार्टवर मिळतेय ऑफर

कलर ऑप्शन : Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन सनराइज सिटी कलर आणि बेश वेगन, लेदर ब्लॅक आणि गोल्ड आणि सिल्व्हर स्टिचिंग डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here