Categories: बातम्या

5 सप्टेंबरला लॉन्च होईल 8जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 845 असलेला नुबिया झेड18

टेक कंपनी नुबिया आपल्या झेड स्मार्टफोन सीरीज मध्ये झेड18 स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे, याची चर्चा कित्येक दिवस चालूच आहे. नुबिया झेड18 चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट करण्यात आले आहे जिथे फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. पण आता कंपनी ने या पावरफुल फोनची लॉन्च डेट सांगितली आहे. नुबिया ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून लॉन्च ईवेंट शेयर केला आहे. या इन्वाईट मधून कंपनी ने घोषणा केली आहे की नुबिया झेड18 5 सप्टेंबरला टेक मंचावर पहिल्यांदा येईल.

नुबिया ने शेयर केलेल्या या टीजर मध्ये फोन चा शेप बनवण्यात आला आहे आणि 5 सप्टेंबर ची लॉन्च डेट लिहिण्यात आली आहे. फोनच्या ईमेंज मध्ये फ्रंट पॅनल वर वॉटरड्राप डिस्प्ले दिसत आहे आणि फोन चे कोपरे बेजल लेस आहेत. टीजर वरून हे स्पष्ट झाले आहे की नुबिया झेड18 पण नवीन ट्रेंड फॉलो करत ‘वी’ शेप वाला नॉच डिस्प्ले घेऊन येणार आहे. समोर आलेल्या लीक्स नुसार फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.88-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल.

नुबिया झेड18 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार नुबियाचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 8जीबी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये क्रमश: 128जीबी मेमरी आणि 64जीबी स्टोरेज असू शकते. टेना च्या लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले होते की नुबिया झेड18 एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालेल तसेच ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 630 मिळेल.

लीक नुसार नुबिया झेड18 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा मिळेल ज्यात प्राइमरी कॅमेरा 24-मेगापिक्सल चा तसेच 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा असेल. त्याच प्रमाणे सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. नुबिया झेड18 बद्दल बोलले जात आहे की या फोन मध्ये 4जी वोएलटीई सह डुअल सिम व यूएसबी टाईप-सी सारखे फीचर्स असतील आणि यात 3,050एमएएच ची बॅटरी मिळेल.

नुबिया झेड18 येत्या 5 सप्टेंबरला चीन मध्ये लॉन्च होत आहे. फोनची किंमत तसेच याच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे. हा फोन 5 सप्टेंबरला चीनी बाजारात येईल. त्यामुळे नुबिया झेड18 ग्लोबल मंचावर कधी येईल याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

Published by
Siddhesh Jadhav