Vivo X100s, X100s Pro आणि X100 Ultra किंमत झाली लीक, किंमतीच्या बाबतीत देणार iPhone ला टक्कर

विवो कंपनी 13 मे ला चीनमध्ये आपली Vivo X100s series सादर करेल. या सीरिज अंतर्गत विवो एक्स 100 एस तसेच एक्स 100 एस प्रो स्मार्टफोन लाँच केले जातील. तसेच या दोन्ही मोबाईल सह Vivo X100 Ultra पण लाँच होऊ शकतो. तसेच आज घोषमा एक आठवडा पहिले या तिन्ही स्मार्टफोनची किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे. फोनची रॅम व मेमरी व्हेरिएंट तसेच त्याची किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo X100s किंमत (लीक)

  • 12GB RAM + 256GB Storage = 3999 Yuan (जवळपास 46,000 रुपये)
  • 16GB RAM + 256GB Storage = 4399 Yuan (जवळपास 50,900 रुपये)
  • 16GB RAM + 512GB Storage = 4699 Yuan (जवळपास 54,000 रुपये)
  • 16GB RAM + 1TB Storage = 5199 Yuan (जवळपास 60,000 रुपये)

लीकनुसार चीनमध्ये विवो एक्स 100 एस चार व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. याच्या बेस मॉडेलचा किंमत 46 हजार रुपयांच्या आसपास सांगण्यात आली आहे ज्यात 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज दिले जाऊ शकते. तसेच मोबाईलच्या सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 60 हजार रुपयांच्या आसपास सांगितली जात आहे तसेच यात 16 जीबी रॅमसह 1 टीबी स्टोरेज मिळू शकते.

Vivo X100s Pro किंमत (लीक)

  • 12GB RAM + 256GB Storage = 4999 Yuan (जवळपास 57,900 रुपये)
  • 16GB RAM + 512GB Storage = 5599 Yuan (जवळपास 64,900 रुपये)
  • 16GB RAM + 1TB Storage = 6199 Yuan (जवळपास 71,900 रुपये)

विवो एक्स 100 एस प्रो च्या सर्व व्हेरिएंट्सची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा अधिक ठेवली जाऊ शकते. लीकमध्ये या फोनचे तीन व्हेरिएंट्स समोर आले आहेत ज्याची किंमत भारतीय चलनानुसार 57,000 रुपये ते 72,000 रुपयांपर्यंत ठेवली जाऊ शकते.

Vivo X100 Ultra किंमत (लीक)

  • 12GB RAM + 256GB Storage = 6699 Yuan (जवळपास 77,500 रुपये)
  • 16GB RAM + 512GB Storage = 7499 Yuan (जवळपास 86,900 रुपये)
  • 16GB RAM + 1TB Storage = 8499 Yuan (जवळपास 98,000 रुपये)

लीकनुसार या फोनच्या सर्वात मोठ्या मॉडेलमध्ये 16 जीबी रॅमसह 1 टीबी स्टोरेज दिले जाईल ज्याची किंमत 1 लाख रुपयांच्या आसपास जाऊ शकते. परंतु आशा करू शकता की जर Vivo X100s series तसेच Vivo X100 Ultra भारतात चीनच्या तुलनेत कमी किंमतीत लाँच होईल.

Vivo X100s series चा परफॉर्मन्स

​आतापर्यंत अधिकृत झाले नाही, परंतु लीकमध्ये समोर आले आहे की Vivo X100s आणि X100s Pro ​जगातील पहिला स्मार्टफोन असले जो MediaTek Dimensity 9300 Plus चिपसेटवर लाँच केला जाईल. हा चिपसेट 7 मे ला रिलीज होईल. चर्चा आहे की हा डाइमेंसिटी 9300 चे ओव्हरलॉक्ड व्हर्जन असेल जे 3.4GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करेल. तसेच ग्राफिक्ससाठी या चिपसेटसह मोबाईल फोनमध्ये Immortalis-G720 MC12 GPU पण दिले जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here