6,000mAh Battery असलेला iQOO Z9x 5G फोन या दिवशी होईल भारतात लाँच, 15 हजारांपेक्षा पण कमी असेल किंमत

आयकूने गेल्याच महिन्यात चीनमध्ये आपल्या ‘झेड’ सीरिज अंतर्गत iQOO Z9x 5G फोन लाँच केला होता ज्याला Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर तसेच 6,000mAh Battery च्या ताकदसह मार्केटमध्ये एंट्री घेतली होती. तसेच आता हा मोबाईल फोन भारतीय बाजारात पण येणार आहे. कंपनीकडून आयकू झेड 9 एक्सची भारतातील लाँचच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे, ज्याला तुम्ही पुढे वाचू शकता.

iQOO Z9x भारतातील लाँचची माहिती

आयकू झेड 9 एक्स 5 जी फोन 16 मे ला भारतात लाँच होईल. कंपनीने फोनची माहिती शेअर करत सांगितले आहे की या तारखेला iQOO Z9x किंमत तसेच सेलच्या माहितीवरून उठविला जाईल. आयकू आपल्या अगामी मोबाईल फोनला #FullDayFullyLoaded हॅशटॅग सह टिझ करत आहे. आशा करू शकता की याचे स्पेसिफिकेशन चीनच्या मॉडेल सारखे मिळतील.

iQOO Z9x चे स्पेसिफिकेशन

  • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1
  • 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 6.72″ फुलएचडी+ 120 हर्ट्झ डिस्प्ले
  • 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
  • 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 44 वॉट फास्ट चार्जिंग
  • 6,000 एमएएचची बॅटरी

प्रोसेसिंग : iQOO Z9x अँड्रॉईड 14 आधारित फनटच ओएस 14 वर लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी ​एड्रेनो 710 जीपीयू आहे.

मेमरी : चीनमध्ये हा फोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 12 जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी पण आहे जी फिजिकल रॅमसह मिळून याला 24 जीबी पर्यंत वाढवते. तसेच मोबाईलमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

स्क्रीन : आयकू झेड 9 एक्स 5 जी फोन 2408 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणारा 6.72 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असणारी ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 1000 निट्स हाई ब्राईटनेस मिळते.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी आयकू झेड 9 एक्स ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असणारा 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह मिळून चालतो. तसेच सेल्फी काढणे आणि रिल्स बनविण्यासाठी या फोनमध्ये एफ/2.05 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे

बॅटरी : iQOO Z9x 5G फोन पावर बॅकअपसाठी 6,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

iQOO Z9x किंमत

आयकू झेड 9 एक्स चीन तीन व्हेरिएंट्समध्ये सादर झाला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे ज्याची किंमत 1149 युआन आहे. ही किंमत भारतीय चलनानुसार 13,199 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे की iQOO Z9x भारतातील किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here