देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्स पैकी एक खरेदी करण्याआधी बुक करावी लागते. परंतु, जर तुम्ही या ई-स्कूटरची बुकिंग करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कदाचित तुम्ही ज्या वेबसाइटवरून OLA Scooter ची बुकिंग करत असाल ती फेक असू शकते त्यामुळे तुमची बुकिंग अमाउंट कंपनीकडे न जाता थेट सायबर गुन्हेगारांच्या अकाऊंटमध्ये पोहोचू शकते. ओला स्कूटर बुक करण्याच्या नावावर कोट्यवधींची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंत ओला इलेक्ट्रिक स्कूटर बुक करण्याच्या नावाखाली अनेक ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे.
20 आरोपींना अटक
माहितीनुसार सर्व आरोपी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बसून ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली फसवणूक करत होते. अशा घटना वाढत असल्यामुळे पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या 20 Cyber criminals ना अटक करण्यात आलं. हे देखील वाचा: चुटकीसरशी फुल चार्ज! 200W Fast Charging च्या शक्तीसह iQOO 11 Pro येतोय भारतात, लाँच डेट लीक
1000 लोकांना कोट्यवधींचा चुना लावला
दिल्ली पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे की सायबर गुन्हेगारांच्या एका गँगनं कमीत कमी 1,000 लोकांना फसवलं आहे. माहितीनुसार, बंगळुरूमध्ये राहून दोन आरोपींनी ओलाची एक फेक वेबसाइट डिजाइन केली होती, जिच्या माध्यमातून वेबसाइटवर विजिट करणाऱ्या लोकांना फसवून आपल्या जाळ्यात ओढत होते. दिल्ली पोलिसांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर स्कॅम करण्याच्या आरोपाखाली 20 आरोपींना अटक केलं आहे.
अशी होते ओला स्कूटर बुकिंगच्या नावाखाली फसवणूक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्राहक ओला ई-स्कूटीची माहिती घेण्यासाठी गुगलवर सर्च करत होते, तेव्हा त्यांना ही नकली वेबसाइट दिसत होती. त्यानंतर या गँगचे आपणच कंपनी असून ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करत होते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढली; चीनी ब्रँड्सना मिळणार स्वस्त Samsung Galaxy M04 कडून तगडे आव्हान
चार्जेसच्या नावाखाली एक्स्ट्रा पैसे
बातम्यांनुसार ग्राहक या गुन्हेगारांची नकली वेबसाइट ओपन करून आपले डिटेल सबमिट करत होते. त्यानंतर ग्राहकांना फोन करून त्यांच्याकडे 499 रुपये बुकिंग अमाउंटची मागणी केली जायची. एकदा का ही बुकिंग अमाऊंट म्हणून 499 रुपये ट्रांसफर झाले की त्यानंतर स्कूटरच्या इंश्योरेंस, टॅक्स आणि ट्रांसपोर्टेशन चार्जेसच्या नावाखाली एका ग्राहकाकडून 50,000 ते 70,000 रुपये घेतले जात होते. अशा जवळपास 1,000 ग्राहकांची फसवणूक करून या सायबर गुन्हेगारांनी कोट्यावधी रुपये कमवले होते.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.
