Samsung Galaxy M04 चं सपोर्ट पेज वेबसाइटवर लिस्ट; माहिती झाली लीक

Samsung Galaxy A04e
Samsung Galaxy A04e

सॅमसंग संबंधीत महत्वाची माहिती समोर आली आहे की कंपनी भारतात आपल्या ‘एम’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि लवकरच नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M04 भारतात लाँच करू शकते. सॅमसंग गॅलेक्सी ए04 चं सपोर्ट पेज कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे त्यामुळे या सॅमसंग मोबाइल फोनच्या लाँचची माहिती मिळाली आहे. Samsung Galaxy M04 स्मार्टफोन कंपनीच्या Samsung Galaxy A04e चा भारतीय व्हर्जन असेल जो लो बजेटमध्ये भारतात लाँच केला जाईल.

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनचं सपोर्ट पेज कंपनीच्या इंडियन वेबसाइटवर लिस्ट झालं आहे जे सर्वप्रथम माय स्मार्ट प्राइस वेबसाइटनं स्पॉट केलं आहे. फोनच्या सपोर्ट पेज सोबतच इथे युजर मॅन्युअल देखील अपलोड करण्यात आला आहे. वेबसाइटवर गॅलेक्सी ए04 SM-M045F/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये फोनचे फोटो, फीचर, स्पेसिफिकेशन्स किंवा लाँचची माहिती मिळाली नाही, परंतु आशा आहे की आता सॅमसंग लवकरच Galaxy M04 भारतात लाँच करेल. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त 5G फोनची विक्री उद्यापासून; 9,999 रुपयांमध्ये स्वदेशी कंपनी देतेय शानदार फिचर

Samsung Galaxy M04 specifications

सॅमसंग गॅलक्सी एम04 स्मार्टफोन गॅलेक्सी ए04ई चा भारतीय व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आशा आहे की दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील एक सारखे असतील. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले इनफिनिटी ‘वी’ ला सपोर्ट करतो. या सॅमसंग स्मार्टफोनचे डायमेंशन 164.2 x 75.9 x 9.1एमएम आणि वजन 188ग्राम आहे.

Samsung Galaxy A04e launched know price specifications camera processor battery ram storage details

Samsung Galaxy A04e अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय कोर 4.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन आयएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयूला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई 4जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी इस सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 2.2/अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: वापरलेल्या स्मार्टफोनला देखील इथे मिळेल जबरदस्त किंमत, घरबसल्या करा सौदा

Samsung Galaxy A04e ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि 4जी एलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक व बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए04ई Black, Orange Copper आणि Light Blue कलरमध्ये मार्केटमध्ये सादर झाला होता त्यामुळे Samsung Galaxy M04 देखील याच ऑप्शन्ससह लाँच होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here