OnePlus नं कंफर्म केलं आहे की कंपनी आपला आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10T 5G जागतिक बाजारासह भारतात देखील लाँच करार आहे. आता बातमी आली आहे की हा फोन 3 ऑगस्टला लाँच होणार आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन भारतात ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon.in आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. वनप्लसच्या 3 ऑगस्टच्या लाँच इव्हेंटची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होईल, जो कंपनीच्या YouTube चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
OnePlus 10T स्मार्टफोन लाँचपूर्वीच अॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. लिस्टिंगनुसार भारतात या फोनची प्री बुकिंग लाँचच्या दिवशीच सुरु होईल. म्हणजे OnePlus 10T स्मार्टफोन भारतात 3 ऑगस्टपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. लाँच इव्हेंट आटोपताच या फोनचे प्री ऑर्डर घेण्यास सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. लीक रिपोर्ट्सनुसार वनप्लसचा हा फोन लाँचनंतर एक आठवड्यांनी विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.
OnePlus 10T चे कलर आणि स्टोरेज व्हेरिएंट
टिपस्टर मुकुल शर्मानं सांगितलं आहे की आगामी OnePlus 10T 5G स्मार्टफोन 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह मूनस्टोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. लीक रिपोर्ट्सनुसार, हा फोन 8/12GB RAM ऑप्शन आणि 512GB पर्यंत इंटरनलस्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. तसेच वनप्लसचा हा फोन मूनस्टोन ब्लॅक आणि जेड ग्रीन या दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. हे देखील वाचा: OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार?
OnePlus 10T ची संभाव्य किंमत
OnePlus 10T स्मार्टफोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत समोर आली आहे. त्यानुसार हा फोन 799 यूरो (सुमारे 65,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय किंमत 50 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. वनप्लसच्या या फोनच्या रिटेल बॉक्समध्ये चार्जर, यूएसबी केबल, फोन केस आणि सिम इजेक्टर टूल दिला जाईल.
OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस 10टी 5जी फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.7-inch Fluid AMOLED डिस्प्ले दिली जाऊ शकते जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या मोबाईल फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट असण्याची बातमी आली आहे. जो आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली क्वॉलकॉमचा चिपसेट असेल. हे देखील वाचा: वनप्लस-शाओमीला छोट्याश्या ब्रँड कडून आव्हान; दणकट प्रोसेसरसह सर्वात पहिल्या फोनची भारतात एंट्री
फोटोग्राफीसाठी OnePlus 10T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50MP IMX766 प्रायमरी सेन्सरसह 8MP ultrawide आणि 2MP macro लेन्सचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाईल फोन 16MP Selfie कॅमेऱ्यासह येईल. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 150W fast charging सपोर्ट असलेली 4,800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
