OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार?

OPPO Reno8 series अखेरीस भारतात लाँच करण्यात आला आहे. OPPO नं भारतात OPPO Reno 8 5G आणि OPPO Reno 8 Pro 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सना भारतातील स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. यातील Reno8 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पाहता काही दिवसांपूर्वी लाँच झालेला OnePlus Nord 2T या डिवाइसला चांगली टक्कर देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला Reno8 घ्यावा की वनप्लस नॉर्ड 2टी घ्यावा असा प्रश्न पडला असेल, पुढे आम्ही दोन्ही फोन्सच्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची तुलना केली आहे. यातून चित्र स्पष्ट होईल.

OPPO Reno 8 5G vs OnePlus Nord 2T 5G: price in India

OPPO Reno 8 5G शिमर गोल्ड आणि शिमर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आहे. हा फोन एकच स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध झाला. डिवाइसच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,990 रुपये आहे.

दुसरीकडे OnePlus Nord 2T 5G दोन व्हेरिएंटमध्ये येतो. बेस मॉडेलमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे आणि याची किंमत 28,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी 33,999 रुपये मोजावे लागतील.

Design

OPPO Reno 8 स्मार्टफोन खूप स्टायलिश डिजाइनसह बाजारात आला आहे. फोनच्या फ्रंटला चारही बाजूंना बेजल लेस डिजाइन देण्यात आली आहे. तसेच टॉप लेफ्ट कॉर्नरला पंच होल कॅमेरा आहे. फोनच्या मागे असलेल्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या उजवीकडे पावर बटन व डावीकडे वॉल्यूम बटन आहेत. तसेच बॉटमला टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पिकर ग्रिल मिळते.

वनप्लस नॉर्ड 2टी प्लास्टिक मिड-फ्रेमसह एक ग्लास सँडविच डिजाइनसह येतो. फोनच्या मागे सिल्की-स्मूद ग्लास आणि फ्रंटला गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. मागे ट्रिपल लेन्स असलेला मोठा कॅमेरा मॉड्यूल आहे. OnePlus Nord 2T मध्ये कोणतीही फॅन्सी LED नाही. त्याऐवजी यात Apple iPhones प्रमाणे एक अलर्ट स्लायडर आहे. तसेच फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉटचा ऑप्शन पण मिळतो. हा फोन झेड फॉग आणि ग्रे शॅडो रंगात विकत घेता येईल.

Processor, RAM, and Storage

OPPO Reno8 मध्ये MediaTek Dimensity 1300 चिपसेटदही टाकडे देण्यात आली हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड कलरओएस 12.1 वर चालतो. तसेच फोनमध्ये 8GB रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

OnePlus Nord 2T स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आणि Mali G77 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंतची UFS3.1 स्टोरेज मिळते.

Display

OPPO Reno8 मध्ये 6.43-inch FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेचा स्क्रीन टू-बॉडी रेशियो 90.8 टक्के आहे. हा डिस्प्ले नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ द्वारे एचडी सर्टिफाईड आहे. तसेच हा एक SGS Eye Care Display आहे.

नॉर्ड 2 टीसाठी मध्ये कंपनीनं नॉर्ड 2 पॅनलचा उपयोग केला आहे. यात 90Hz रिफ्रेश रेट आणि HDR सर्टिफिकेशन सह 6.43-इंचाचा फुल HD + AMOLED पॅनल देण्यात आला आहे.

Camera

OPPO Reno8 मध्ये MariSilicon X हा वेगळा चिपसेट खास फोटोग्राफीसाठी देण्यात आला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी, 2MP चा B&W सेन्सर, आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा Sony IMX709 शूटर मिळतो.

दूसरीकडे OnePlus Nord 2T 5G मध्ये देखील ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यात प्रायमरी कॅमेरा OIS, EIS सपोर्ट असलेला 50MP Sony IMX766 सेन्सर f/18 अपर्चरसह देण्यात आला आहे. सोबतीला 8MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. फ्रंटला AI सेल्फीसाठी 32MP Sony IMX615 सेल्फी शूटर आहे.

Battery and Connectivity

दोन्ही फोनमध्ये 4,500mAh battery देण्यात आली आहे. तसेच दोन्ही फोन 80W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करतात. ओप्पोनं मात्र दावा केला आहे की, OPPO Reno8 फोन फक्त 28 मिनिटांत फुल चार्ज होईल.

OPPO Reno 8 मध्ये 5G, 4G+, 4G, 3G आणि 2G नेटवर्क सपोर्ट आहे. तसेच यात Bluetooth v5.3 आणि Bluetooth Low Energy (BLE) चा सपोर्ट देखील मिळतो. OnePlus Nord 2T 5G मध्ये ड्युअल-बँड 4G आणि 5G सपोर्ट, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, GPS आणि डेटा ट्रांसफरसाठी USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here