पुढील आठवड्यात 7 फेब्रुवारीला OnePlus नं क्लाउड 11 नावाच्या इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी आपल्या काही नव्या डिवाइसची घोषणा करेल. यात फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 11 5G, अप्पर मिड रेंज स्मार्टफोन OnePlus 11R 5G, OnePlus TV 65 Q2 Pro स्मार्ट टीव्ही, OnePlus Buds 2 Pro TWS इअरबड्स आणि OnePlus Pad टॅबलेटचा समावेश असू शकतो.
यातील सर्वच डिवाइसची अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही परंतु OnePlus 11 या इव्हेंटमधून येईल हे मात्र कंपनीनं काही दिवसांपूर्वीच घोषित केलं होतं, त्याचबरोबर OnePlus 11R देखील येईल हे कंपनीनं आता सांगितलं आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार आगामी वनप्लस 11आर मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 प्रोसेसर मिळेल. कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून OnePlus 11R टीज केला आहे. प्रोसेसर व्यतिरिक्त या स्मार्टफोनची इतर कोणतीही माहिती कंपनीनं शेअर केली नाही. हे देखील वाचा: YouTube Channel बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या इथे, फॉलो करा या स्टेप्स
The next generation of power is here. It's time to get ready for a new way to experience the #ShapeofPower with the all-new #OnePlus11R 5G.
— OnePlus India (@OnePlus_IN) January 27, 2023
OnePlus 11R चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
- 6.7 FHD+ 120Hz AMOLED Screen
- Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
- 50MP Rear + 32MP Selfie Camera
- 100W fast charging
OnePlus 11R संबंधित लीकनुसार हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. ही स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असल्याचं सांगण्यात आलं आहे, जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.
फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: दुकानात जाऊन जुना फोन एक्सचेंज करण्याऐवजी ‘या’ वेबसाइटवर विका; मिळेल बेस्ट किंमत
वनप्लस 11आर बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फ्लॅगशिप फोन 16 जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो जोडीला 512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. हा फोनचा मोठा मॉडेल असेल तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळू शकते.
