OnePlus 11 5G फोन 7 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. ही माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. परंतु आता बातमी समोर आली आहे की या दिवशी ब्रँडचा आणखी मिडरेंज फ्लॅगशिप फोन OnePlus 11R देखील भारतीय बाजारात सादर केला जाईल. ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन इंडियानं 11आर स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. पुढे आम्ही या मोबाइल फोनच्या लाँच डिटेल्स सोबतच वनप्लस 11आर च्या प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.
OnePlus 11R India Launch
OnePlus 11R 5G Phone लाँच डेटचा खुलासा अॅमेझॉन इंडियानं पुश नोटिफिकेशनच्या माध्यमातून केला आहे, तसेच फोनचा टीजर पोस्टर देखील शॉपिंग साइटनं दाखवला आहे. या वनप्लस फोनला ‘The Shape of Power’ म्हटलं जात आहे जो 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी भारतात लाँच होईल. विशेष म्हणजे हाच OnePlus 11 5G फोनचा लाँच इव्हेंट आहे, त्यामुळे दोन्ही स्मार्टफोन एकत्र भारतात लाँच होतील, हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: 15 हजारांच्या रेंजमध्ये Motorola चा नवाकोरा फोन; कमी किंमतीत Moto G13 आणि Moto G23 ची एंट्री
OnePlus 11R Price
वनप्लस 11आरच्या किंमतीची माहिती देखील काही दिवसांपूर्वी टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली होती. लीकमध्ये सांगण्यात आलं होतं की हा मोबाइल दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये भारतीय बाजारात येऊ शकतो. लीकनुसार बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते ज्याची किंमत 35 ते 40 हजार दरम्यान असू शकते. तर मोठा OnePlus 11R 16GB + 512GB व्हेरिएंट भारतात 40,000 ते 45,000 रुपयांच्या बजेटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
OnePlus 11R चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
- 6.7 FHD+ 120Hz AMOLED Screen
- Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
- 50MP Rear + 32MP Selfie Camera
- 100W fast charging
OnePlus 11R संबंधित लीकनुसार हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. हे स्क्रीन अॅमोलेड पॅनल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येऊ शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंगसह मिळू शकते.
फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: एकही रुपया न देता पाहा भुवन बामची वेब सीरिज; आयुष्मानचा अॅक्शनपट देखील येतोय या आठवड्यात
वनप्लस 11आर बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फ्लॅगशिप फोन 16 जीबी रॅमसह लाँच केला जाईल जोडीला 512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. हा फोनचा मोठा मॉडेल असेल तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळू शकते.
