एकही रुपया न देता पाहा भुवन बामची वेब सीरिज; आयुष्मानचा अ‍ॅक्शनपट देखील येतोय या आठवड्यात

Highlights

  • जानेवारी 2023 च्या चोथ्या आठवड्यात अनेक वेबसिरीज येणार ओटीटीवर
  • काही चित्रपट देखील या आठवड्यात ओटीटीवर रिलीज केले जातील.
  • भुवन बामची नवीन वेब सीरिज होणार रिलीज.

जर तुम्ही देखील त्या प्रेक्षकांपैकी एक असाल ज्यांना घर बसल्या चित्रपट आणि वेब सीरीज पाहायला आवडतात तर आम्ही तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलो आहोत. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरीज रिलीज (New OTT releases this week) होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवरून घरी आरामात मोबाइल फोन, टीव्ही व लॅपटॉपवर बघता येतील. या आठवड्यात An Action Hero, Jaanbaaz Hindustan Ke, Narvik सारख्या सीरीज व मूव्ही ऑनलाइन स्ट्रीम होण्यासाठी तयार आहेत.

New OTT releases this week

  • An Action Hero
  • Jaanbaaz Hindustan Ke
  • 18 Pages
  • Dhamaka
  • Narvik
  • Rafta Rafta

An Action Hero

नावावरून स्पष्ट झालं आहे की हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ मध्ये Ayushmann Khurrana आणि Jaideep Ahlawat यांची प्रमुख भुमिका आहे. Ayushmann चित्रपटात मानव खुरानाची भूमिका करत आहे जो एक सुपरस्टार आणि एक यूथ आयकॉन आहे. मानव लाखो चाहत्यांच्या मनावर तोपर्यंत राज्य करतो जोवर तो हरियाणामध्ये एका शूटिंग दरम्यान एका दुर्घटनेत सहभागी झालेला नसतो. त्यानंतर तो लंडनला राहतो परंतु तिथेही भूतकाळ त्याचा पिच्छा सोडत नार्ही. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 27 जानेवारीला रिलीज केला जात आहे. हे देखील वाचा: Honda Activa Electric लाँच बद्दल खुद्द CEO नी केला खुलासा; लवकरच येणार इलेक्ट्रिक स्कूटर

Jaanbaaz Hindustan Ke

ही सीरीज एका आयपीएस अधिकाऱ्याच्या आयुष्याभोवती फिरते. ही अ‍ॅक्शन थ्रिलर सीरीज भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ZEE5 वर रिलीज केली जात आहे. या वेब सीरीजमध्ये Regina Cassandra, Barun Sobti, Sumeet Vyas, Mita Vashisht, Chandan Roy आणि Aashish Dubey सारखे कलाकार आहेत.

18 Pages

18 पेज एक तेलुगु फीचर फिल्म आहे ज्यात निखिल सिद्धार्थ आणि अनुपमा परमेश्वरन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट सिद्धू आणि अकाली स्मृभ्रंशनं पीडिती असलेल्या नंदिनी नावाच्या तरुणीची गोष्ट सांगतो. हा चित्रपट फिल्म Netflix वर 27 जानेवारीला रिलीज केला जात आहे.

Dhamaka

साउथ अ‍ॅक्शन चित्रपट आवडणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. कारण रवी तेजाचा धमाकेदार चित्रपट आता ओटीटीवर रिलीजसाठी तयार आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आल्यानंतर Netflix वर 22 जानेवारीला रिलीज झाला आहे. हा action-comedy चित्रपट Telugu मध्ये ही रिलीज केला गेला आहे.

Narvik

ऐतिहासिक युद्ध ड्रामा चित्रपट Narvik चे दिग्दर्शन अमांडा पुरस्कार विजेता एरिक स्कोल्डबजेरग यांनी केलं आहे. हा चित्रपट Netflix वर 23 जानेवारीला रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट एका नॉर्वेजियन सैनिकांची गोष्ट सांगतो. हे देखील वाचा: Patla Tar Ghya शोमधून होणार तुमच्या आवडत्या मराठी कलाकारांची पोलखोल; मोफत करता येणार स्ट्रीम

Rafta Rafta

युट्युब नंतर ओटीटीवर धुमाकूळ घालणाऱ्या Bhuvan Bam चा नवीन वेब शो ‘रफ्ता रफ्ता’ रिलीज झाला आहे. ही वेब सीरीज 25 जानेवारीला अ‍ॅमेझॉन मिनी टीव्हीवर रिलीज करण्यात आली आहे. ‘रफ्ता रफ्ता’ मध्ये दोन व्यक्तीच्या मनाला भावणारी गोष्ट दाखवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here