Home बातम्या OnePlus Ace 3V स्मार्टफोन 21 मार्चला चीनमध्ये होईल लाँच, ब्रँडने केले कंफर्म

OnePlus Ace 3V स्मार्टफोन 21 मार्चला चीनमध्ये होईल लाँच, ब्रँडने केले कंफर्म

HIGHLIGHTS

वनप्लसच्या ऐस सीरिजचा नवीन स्मार्टफोन घरेलू बाजार चीनमध्ये 21 मार्चला येणार आहे. डिव्हाईसची एंट्री OnePlus Ace 3V नावाने होणार आहे. ब्रँडद्वारे वनप्लसच्या वेबसाईटवर याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईलचा फोटो डिझाईनची पण माहिती मिळत आहे, तसेच काही प्रमुख स्पेसिफिकेशन पण शेअर केले गेले आहेत. चला, पुढे तुम्हाला फोनबद्दल पूर्ण अपडेट देत आहोत.

OnePlus Ace 3V लाँचची तारीख आणि डिझाईन

OnePlus Ace 3V चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

डिस्प्ले: OnePlus Ace 3V स्मार्टफोन चीनमध्ये कोणत्या डिस्प्ले आकारामध्ये येईल याची माहिती मिळाली नाही परंतु हा 2772 x 1240 के पिक्सल रिजॉल्यूशन, 1.5K OLED डिस्प्लेसह असू शकतो. ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे.

चिपसेट: मोबाइलमध्ये युजर्सना Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच ही चिप येत्या 18 मार्चला सादर होऊ शकते. म्हणजे हा या प्रोसेसरसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे.

स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी मोबाईलमध्ये 16GB रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.

कॅमेरा: OnePlus Ace 3V स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळण्याची चर्चा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP लेन्स दिली जाऊ शकते.

बॅटरी: OnePlus Ace 3V मध्ये ग्राहकांना 5,500mAh ची बॅटरी आणि याला चार्ज करण्यासाठी 100W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.

इतर: फोनमध्ये एआय टेक्नॉलॉजी, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5जी, वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक फिचर्स दिले जाऊ शकतात.

ओएस: OnePlus Ace 3V ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत अँड्रॉइड 14 आधारित ColorOS 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.