OnePlus Ace 3V स्मार्टफोन 21 मार्चला चीनमध्ये होईल लाँच, ब्रँडने केले कंफर्म

HIGHLIGHTS

  • OnePlus Ace 3V स्मार्टफोन 21 मार्चला सादर होणार आहे.
  • यात Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट मिळू शकते.
  • ही रिंग एलईडी फ्लॅशसह टिझरमध्ये दिसला आहे.

वनप्लसच्या ऐस सीरिजचा नवीन स्मार्टफोन घरेलू बाजार चीनमध्ये 21 मार्चला येणार आहे. डिव्हाईसची एंट्री OnePlus Ace 3V नावाने होणार आहे. ब्रँडद्वारे वनप्लसच्या वेबसाईटवर याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईलचा फोटो डिझाईनची पण माहिती मिळत आहे, तसेच काही प्रमुख स्पेसिफिकेशन पण शेअर केले गेले आहेत. चला, पुढे तुम्हाला फोनबद्दल पूर्ण अपडेट देत आहोत.

OnePlus Ace 3V लाँचची तारीख आणि डिझाईन

  • कंपनीच्या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार OnePlus Ace 3V फोन चीनमध्ये 21 मार्चला लाँच होईल.
  • हा फोन लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चीनच्या लोकल वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता एंट्री घेणार आहे.
  • कार्यक्रमाची टॅगलाईन एआय परफॉर्मन्स आणि स्मार्टफोनची जास्त वेळापर्यंत चालणारी बॅटरी लाईफ बाबत सांगत आहे.
  • अधिकृत रेंडरच्या माध्यमातून दिसत आहे की वनप्लस ऐस 3वी ची डिझाईन आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळी आहे.
  • डिव्हाईसच्या नवीन प्रकारच्या कॅमेरा मॉड्यूलसह दाखविण्यात आले आहे. यात रिंग एलईडी फ्लॅश मॉड्यूलमध्ये आहे.
  • स्मार्टफोनच्या मध्ये वनप्लसचा लोगो देण्यात आला आहे. उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. डाव्या बाजूला अलर्ट स्लाईडर देण्यात आला आहे.
  • फोनला दोन कलरमध्ये दाखविण्यात आले आहे जे संभावित ब्लॅक आणि पर्पल असू शकतात.

OnePlus Ace 3V चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

डिस्प्ले: OnePlus Ace 3V स्मार्टफोन चीनमध्ये कोणत्या डिस्प्ले आकारामध्ये येईल याची माहिती मिळाली नाही परंतु हा 2772 x 1240 के पिक्सल रिजॉल्यूशन, 1.5K OLED डिस्प्लेसह असू शकतो. ज्यावर 120Hz रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे.

चिपसेट: मोबाइलमध्ये युजर्सना Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच ही चिप येत्या 18 मार्चला सादर होऊ शकते. म्हणजे हा या प्रोसेसरसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे.

स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी मोबाईलमध्ये 16GB रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.

कॅमेरा: OnePlus Ace 3V स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळण्याची चर्चा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP लेन्स दिली जाऊ शकते.

बॅटरी: OnePlus Ace 3V मध्ये ग्राहकांना 5,500mAh ची बॅटरी आणि याला चार्ज करण्यासाठी 100W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.

इतर: फोनमध्ये एआय टेक्नॉलॉजी, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5जी, वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक फिचर्स दिले जाऊ शकतात.

ओएस: OnePlus Ace 3V ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत अँड्रॉइड 14 आधारित ColorOS 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here