Home बातम्या OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा

OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा

वनप्लस कंपनीनं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी आपल्या दुमडणाऱ्या मोबाइल म्हणजे Foldable Phone वर काम करत आहे जो लवकरच बाजारात येऊ शकतो. ह्या फोनच्या नावाची चर्चा जोरदार सुरु होती. हा डिवाइस OnePlus Open किंवा OnePlus V Fold नावानं बाजारात येण्याची शक्यता होती. काल गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold5 आणि Samsung Galaxy Z Flip5 लाँच होताच कंपनीनं वनप्लस फोल्डेबल फोनच्या नावाची माहिती दिली आहे.

OnePlus Open येतोय बाजारात

वनप्लसनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे ज्यात ‘We OPEN when others FOLD’ असं लिहिण्यात आलं आहे. हे ट्वीट सॅमसंगनं आपले नवीन फोल्डेबल फोन लाँच केल्यावर करण्यात आलं आहे. हे ट्वीट पाहून अंदाज लावला जात आहे की वनप्लसनं हिंट दिली आहे की त्यांच्या पहिल्या फोल्डेबल फोनचं नाव OnePlus Open असेल.

OnePlus Open कधी येणार (लीक)

कंपनीनं अद्याप फोल्डेबल वनप्लस फोनच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु अलीकडेच आलेल्या एका लीकमध्ये दावा केला गेला होता की हा स्मार्टफोन म्हणजे OnePlus Open 29 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. ह्या दिवशी हा फोन ग्लोबली लाँच होईल जो सप्टेंबरच्या सुरुवातीला भारतात देखील उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus Open स्पेसिफिकेशन्स (लीक)