Home बातम्या 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत

6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह आला 5G फोन OPPO A55, जाणून घ्या याची खासियत

टेक विश्वात 5G कडे युजर्सचा वाढता कल पाहता सर्व कंपन्यांमध्ये स्वस्त 5जी फोन सादर करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेत पुढे जात चीनी कंपनी ओपोने आपला नवीन OPPO A55 5G फोन सादर केला आहे. हा नवीन स्मार्टफोन कंपनीने आपल्या घरच्या मार्केट मध्ये आणला आहे. वाटरड्रॉप-स्टाइल नॉचसह आलेला हा फोन इतर मार्केट मध्ये सादर करण्याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती मिळाली नाही. पण आशा आहे कि कंपनी लवकरच भारतासह आशियातील मार्केट मध्ये हा फोन सादर केला जाऊ शकतो.

दमदार कॅमेरा

ओपो A55 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात f / 2.2 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा मुख्य सेंसर, f / 2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि अतिरिक्त 2-मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे जो f / 2.4 अपर्चर सह येतो. रियर कॅमेरा मोड्स पाहता यात नाइट सीन, प्रोफेशनल, पॅनोरमिक, पोर्ट्रेट, टाइम-लॅप्स, स्लो मोशन, सुपर टेक्स्ट, अल्ट्रा-क्लियर आणि खूप काही आहे. फोन 10x डिजिटल झूम पर्यंत सपोर्ट करतो. फ्रंटला, यात f / 2.0 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सेल्फी कॅमेरा शूटिंग मोड मध्ये पॅनोरमा, पोर्ट्रेट, नाइट सीन, टाइम-लॅप्स, एआय आयडी फोटो आणि इत्यादी आहे.

Oppo A55 मीडियाटेक डाइमेंशन 700 SoC वर चालतो.

हे देखील वाचा : OPPO F19 आणि F19 Pro च्या भारतातातील एंट्रीचा मार्ग मोकळा!, जाणून घ्या कधी होतील लॉन्च

शानदार डिस्प्ले

यात एक 6.5-इंचाची HD + (720×1,600 पिक्सल) एलसीडी आहे ज्यात एक वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच आहे. फोन मध्ये 88.7 स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 71 टक्के एनटीएसआर कलर, 269ppi पिक्सल डेंसिटी आणि पीक ब्राइटनेस 480 एनआईटी आहे.

प्रोसेसिंग पावर

फोन मीडियाटेक डाइमेंशन 700 SoC वर चालतो. हा प्रोसेसर 5G-सपोर्ट सह 6nm प्रोसेस टेक्नोलॉजी वर आधारित आहे आणि यात ARM Cortex-A78 कोरचा समावेश आहे. तसेच यात 6GB RAM आहे. स्टोरेज (1TB पर्यंत) वाढवण्याच्या पर्यायासह इंटरनल स्टोरेज मध्ये 128GB देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : भारतातील पहिला 1000+ चिपसेट असलेला 5G फोन OPPO Reno5 Pro लॉन्च, आला 65वॉट फास्ट चार्जिंगसह

Oppo A55 5G चीन मध्ये CNY 1,599 (जवळपास 18,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी फीचर्स

Oppo A55 5G पॅक मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन मध्ये 3.5 मिमी ऑडियो जॅक, वाय-फाय 5 (802.11ac), ब्लूटूथ v5.1, आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोनचे डाइमेंशन 163.9×75.7×8.4mm आहे आणि याचे वजन 186 ग्राम आहे. फोन मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. तसेच फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.

किंमत

ओपो A55 5G चीन मध्ये CNY 1,599 (जवळपास 18,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. फोन ब्रिस्क ब्लू आणि रिदम ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये आला आहे. हा फोन JD.com सह चीन मध्ये अनेक ऑनलाइन वेबसाइट वर विकला जाईल.