OPPO F19 आणि F19 Pro च्या भारतातातील एंट्रीचा मार्ग मोकळा!, जाणून घ्या कधी होतील लॉन्च

नवीन वर्षात नवीन फोन्सची तयारी करत असलेल्या स्मार्टफोन कंपनी ओपो बद्दल एक नवीन बातमी समोर आली आहे. माहिती मिळाली आहे कि कंपनी भारतात आपल्या एफ-सीरीज मध्ये नवीन फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. Oppo ने 6 महिन्यांपूर्वी F-17 सीरीज भारतीय बाजारात सादर केली होती. तर आता कंपनी एफ-सीरीज मध्ये कंपनी OPPO F19 आणि F19 Pro च्या लॉन्चची तयारी करत आहे जो फेब्रुवारी 2021 मध्ये येऊ शकतो. याची माहिती XDA Developers’ Tushar Mehta यांनी दिली आहे. माहितीनुसार अपकमिंग OPPO F19 सीरीज किंवा F21 (आणि F21 Pro) सादर केले जातील.

मेहता यांनी ट्विट मध्ये एक जिफ शेयर केली आहे, ज्यात काही माहिती समोर आली नाही. पण, यात ‘एफ’ दाखवण्यात आला आहे, ज्यात फेब्रुवारी लिहिण्यात आले आहे. देशात कंपनी फ्लॅगशिप रेनो 5 प्रो हँडसेट आल्यानंतर कंपनी एका महिन्यानंतर अजून एक मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च करू शकते.

हे देखील वाचा : Exclusive: असे आहेत 6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12/F12 चे फीचर्स

साल 2018 मध्ये अश्या बातम्या आल्या होत्या कि ओपो F19 आणि F19 प्रो 10x लूजलेस झूम सह लॉन्च होऊ शकतात, पण आम्हाला त्यानंतर फोन बाबत जास्त माहिती मिळाली नाही. आम्ही या डिवाइस बाबत अजून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि Exynos 9825 सह लिस्ट झाला 7,000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M62

याव्यतिरिक्त दुसरीकडे ओपो फाइंड एक्स 3 प्रो अलीकडेच एफसीसी वर दिसला होता. लिस्टिंग वरून समजले होते कि अपकमिंग फ्लॅगशिप फोन मध्ये 4,450mAh ची बॅटरी, 65W फास्ट चार्जिंग सॉल्यूशन आणि अँड्रॉइड 11-आधारित ColorOS 11.2 सह लॉन्च होईल. हँडसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC वर चालेल, ज्यात 12GB रॅम दिली जाईल. अशी पण अफवा आहे कि फोन क्वाड-कॅमेरा सिस्टम सह येईल ज्यात 50MP सोनी सेंसर, 25x टेलीफोटो लेंस, एक अल्ट्रा वाइड लेंस आणि एक मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here