Home बातम्या OPPO A78 5G लाँच पूर्वीच IMDA वेबसाइटवर लिस्ट; जानेवारी 2023 मध्ये होऊ शकतो लाँच

OPPO A78 5G लाँच पूर्वीच IMDA वेबसाइटवर लिस्ट; जानेवारी 2023 मध्ये होऊ शकतो लाँच

Oppo Reno9 Pro

OPPO संबंधित बातमी आली आहे की कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A78 5G नावानं लाँच होईल. हा ओप्पो मोबाइल सर्टिफिकेशन्स साइटवर स्पॉट झाला आहे त्यामुळे टेक विश्वात चर्चाना उधाण आलं आहे की ओप्पो ए78 5जी फोन लवकरच बाजारात एंट्री घेईल. ओप्पो कंपनीनं आतापर्यंत OPPO A78 5G फोनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु लीक्स व सर्टिफिकेशन्समध्ये या आगामी ओप्पो मोबाइलचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

OPPO A78 5G फोन सिंगापूरच्या IMDA वेबसाइटवर CPH2483 मॉडेल नंबरनं सर्टिफाइड करण्यात आला आहे. याआधी हा स्मार्टफोन FCC, Bluetooth SIG certification आणि IMEI database मध्ये पण स्पॉट करण्यात आला आहे. या सर्व वेबसाइटवर ओप्पो ए78 5जी या मॉडेल नंबरसह समोर आला आहे. सतत सर्टिफिकेशन्समध्ये दिसल्यामुळे आशा आहे की जानेवारी 2023 मध्ये ओप्पोद्वारे हा ए78 5जी फोन लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 2,500 रुपयांमध्ये तुमचा होईल 12 5G बँड असलेला फोन; 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा मिळवा स्वस्तात

Oppo Reno7

OPPO A78 5G

ओप्पो ए78 5जी फोनबद्दल आतापर्यंत समोर आलेल्या डिटेल्सनुसार हा स्मार्टफोन n5 / n7 / n38 / n44 / n66 5G bands ना सपोर्ट करू शकतो. अँड्रॉइड 13 सोबतच ओप्पो मोबाइलमध्ये कलरओएस 13 असल्याचं समोर आलं आहे. सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन 33वॉट रॅपिड चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो तसेच पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

OPPO A78 5G मध्ये dual-band (2.4GHz – 5GHz) Wi-Fi सोबतच LTE, Bluetooth 5.3 आणि NFC सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळू शकतात. सर्टिफिकेशन्समध्ये ओप्पो ए78 5जी फोनचे डायमेंशन 163.8 x 75.04एमएम आणि वजन 180.09 ग्राम सांगण्यात आलं आहे. ओप्पो ए78 5जी फोनचे इतर फीचर्स व स्पेसिफिकेशन्स अद्याप समोर आले नाहीत.

OPPO Reno 9 5G चे स्पेसिफिकेशन

ओप्पोच्या लेटेस्ट स्मार्टफोन रेनो 9 5जी बद्दल बोलायचं झालं तर, यात 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. OPPO Reno 9 5G मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट देण्यात आला आहे. हा ओप्पो मोबाइल 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 5G Smartphone Under Rs 15000: कमी किंमतीत देखील सर्वाधीक 5G बँड असलेले स्मार्टफोन, पाहा यादी

Oppo Reno9

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO Reno 9 5G 32MP Selfie Camera चा सपोर्ट देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चरवर चालतो. तसेच फोनच्या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.