3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Moto G51 5G फ्लिपकार्टवर उपलब्ध, अशी आहे ऑफर

मोटोरोलाच्या Moto G51 5G स्मार्टफोनवर एक शानदार ऑफर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट देत आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर 4500 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. तसेच 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 12 5G बँड असलेला मोटोराला फोन फक्त 2500 रुपयांमध्ये घरी आणता येईल. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची खासियत पाहता यात क्वॉलकॉमचा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. इथे आम्ही तुम्हाला मोटोरोलाच्या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील आणि फोनचे स्पेसिफिकेशन्स व फिचर्सची माहिती देत आहोत.

Moto G51 5G जबरदस्त डिस्काउंट

Moto G51 5G स्मार्टफोन कंपनीनं 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 17,999 रुपयांमध्ये ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. ज्यावर 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मोटोरोलाचा हा फोन सध्या 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: 5G Smartphone Under Rs 15000: कमी किंमतीत देखील सर्वाधीक 5G बँड असलेले स्मार्टफोन, पाहा यादी

तसेच Motorola च्या या फोनवर फ्लिपकार्ट फेडरल बँक डेबिट कार्ड धारकांना 1500 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या बँक डिस्काउंटमुळे 12 5G बँड असलेला हा फोन 13,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच तुम्ही हा हँडसेट फक्त 2500 रुपयांच्या मासिक हप्त्यांवर देखील खरेदी करू शकता.

Moto G51 5G चे स्पेसिफिकेशन्स

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा LCD पॅनल 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 480+ SoC सह बाजारात आला आहे. सोबतीला Adreno 619 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

Moto G51 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो आणि 8MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत येतोय Motorola चा लो बजेट 5G Phone; लाँचपूर्वीच Moto G13 वेबसाइटवर लिस्ट

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट मिळतो. या फोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्टसह गुगल असिस्टंट बटन देण्यात आलं आहे. त्याचरोबर फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह साइड माउंटेड फिगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यातील IP52 वॉटर रिपेलंट डिजाईन पाण्यापासून फोनचं संरक्षण करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here