ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपली नवीन ओप्पो F21s प्रो सीरीज (OPPO F21s Pro series) सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त F21s Pro 4G आणि F21s Pro 4G असे दोन स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सचे बहुतेक स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स एकसारखे आहेत, फक्त प्रोसेसरमध्ये बदल करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया मिड रेंजमध्ये आलेल्या ओप्पो एफ21एस प्रो 4जी आणि 5जी के प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती.
OPPO F21s Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो एफ21एस प्रो 5जी फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह भारतीय बाजारात आला आहे. फोनची स्क्रीन अॅमोलेड पॅनलवर बनली आहे जिच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच होल देण्यात आला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. हे देखील वाचा: 50MP सेल्फी कॅमेरा आणि 20GB RAM सह Vivo V25 ची भारतात एंट्री; बॅक पॅनल बदलतो रंग
OPPO F21s Pro 5G अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसेरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ओप्पो मोबाइल 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 4,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी ओप्पो एफ21एस प्रो 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढ्याच अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO F21s Pro 5G एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
OPPO F21s Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो एफ21एस प्रो 4जी फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटसह लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच एड्रेनो 610 जीपीयूसह चालतो. लुक, डिजाईन, डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरीच्या बाबतीत दोन्ही ओप्पो मोबाइल जवळपास एक सारखेच आहेत. फक्त एक फोन 5जीला सपोर्ट करतो आणि 4जीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: PUBG Mobile 2.2 update: Erangel चा मॅप बदलणार! छोटया नवीन मॅपसह येतंय नवीन पबजी; जाणून घ्या सविस्तर माहिती
OPPO F21s Pro 5G Price
ओप्पो एफ21एस प्रो 5जी फोन भारतात 8 जीबी रॅमसह लाँच केला गेला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. OPPO F21s Pro 5G Price 25,999 रुपये आहे. या फोनची विक्री 19 सप्टेंबरपासून सुरु होईल तसेच ओप्पो एफ21एस प्रो 5जी Starlight Black आणि Dawnlight Gold कलरमध्ये विकत घेता येईल.
OPPO F21s Pro 4G Price
ओप्पो एफ21एस प्रो 4जी फोन देखील भारतीय बाजारात सिंगल व्हेरिएंटमध्ये आला आहे. हा ओप्पो मोबाइल 8GB RAM + 128GB Storage ला सपोर्ट करतो तसेच 22,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. एफ21एस प्रो फोनची विक्री देखील 19 सप्टेंबर से सुरु होईल तसेच हा फोन Starlight Black आणि Dawnlight Gold कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
