PUBG Mobile 2.2 update: Erangel चा मॅप बदलणार! छोटया नवीन मॅपसह येतंय नवीन पबजी; जाणून घ्या सविस्तर माहिती

PUBG Mobile 2.2

PUBG Mobile हा बॅटल रोयाल सेमेंटमधील लोकप्रिय गेम जरी असला तरी ही लोकप्रिय टिकवून ठेवण्यासाठी गेम डेव्हलपर्स सतत गेम अपडेट करत असतात. या अपडेटमधून गेम मध्ये नवीन फिचर्स आणि अनेक सुधारणा केल्या जातात ज्यामुळे इन-गेम एक्सपीरियंस चांगला होतो आणि गेमर्सची रुची कायम राहते. पबजी गेममध्ये कंपनी सध्या नवीन अपडेट व्हर्जन 2.2 वर्ल्ड वाइड रिलीज करण्याची योजना बनवत आहे. आता याचा बीटा व्हर्जन देखील रिलीज केला गेला आहे. तसेच 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान जे युजर्स नवीन व्हर्जन अपडेट करतील त्यांना स्पेशल रिवार्ड म्हणून 3,000 BP, 100 AG, आणि मॅजिकल नाइट हेलमेट (3D) मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला PUBG Mobile’s 2.2 update APK च्या रिलीज टाइम बाबत सविस्तर माहिती दिली आहे.

PUBG 2.2 APK रिलीज डेट आणि टाइम

PUBG Mobile नं अधिकृतपणे सांगितलं आहे की नवीन 2.2 अपडेटची APK file 15 सप्टेंबरला रिलीज केली जाईल. त्यानंतर काही दिवसांनी वर्ल्डवाइड पबजी युजर्स हा गेम अपडेट डाउनलोड करू शकतील. तसेच प्लेयर्स कडे Google Play Store वरून देखील गेम अपडेट इंस्टॉल करण्याचा ऑप्शन असेल. गेम डेव्हलपर्स 15 सप्टेंबरला (भारतीय वेळेनुसार 9.30 वाजता) गुगल प्ले स्टोरवर गेमचा अपडेट पॅच को रोलआउट करतील. हे देखील वाचा: Tecno Mobile Phones Under 7000: कमी बजेटमध्ये दमदार फीचरसह येणारे जबरदस्त स्मार्टफोन

PUBG Mobile 2.2 मधील नवीन फिचर्स

Nusa map

PUBG NUSA MAP

नवीन अपडेटमध्ये 1×1 मॅप मिळेल, जो बॅटल रोयालमध्ये कमी वेळात खेळून पूर्ण करता येईल. ज्या प्लेयर्सना असा गेमप्ले आवडतो त्यांच्यासाठी नवा पर्याय आहे. त्याचबरोबर गेममध्ये अपडेटसह नवीन वेपन जसे की Tactical Crossbow आणि NS2000 देखील मिळतील. त्याचबरोबर डेव्हलपर्सनी गेममध्ये नवीन मशीन जसे की Special Recall, Zipline, आणि Elevator देखील जोडले आहेत.

Erangel मॅप मध्ये बदल

पबजीच्या Erangel मॅप मध्ये डेव्हलपर्सनी अनेक बदल केले आहेत. अपडेटमध्ये या मॅपमध्ये नवीन Bicycle Shed स्ट्रक्चर देण्यात आलं आहे. तसेच हॉस्पीटल आणि मलटा पावर सारख्या काही लोकेशन्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसेच डेव्हलपर्सनी दोन नवीन पोर्ट Sosnovka Military बेस आणि southwest of Farm देखील जोडले आहेत. मॅपमध्ये नवीन वेदर इफेक्ट – Rainbow आणि नवीन मेकॅनिक Flash Shop, आणि नवीन सिस्टम Gas Station आणि Targeted Supply Crates देखील आले आहेत.

PUBG 2.2 Patch note

शस्त्र झाले अपडेट

AUG: चा फायरिंग रेंज कमी करण्यात आली आहे आणि हिचा बेस डॅमेज, फायरिंग रेट आणि रिलोड स्पीड वाढवण्यात आला आहे.

MK14: फायरिंग रेंज आणि वेपन डॅमेजमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच बुलेट ट्रॅव्हल स्पीड वाढवण्यात आला आहे.

SKS: स्कोपसह सिंगल शॉट फायरिंगमध्ये स्क्रीन शेकचं रिकॉइल ड्यूरेशन कमी करण्यात आलं आहे. रिकॉइल रिकव्हरी स्पीड, बेस डॅमेज आणि मल्टीपल शॉट डॅमेज वाढवण्यात आला आहे.

Mini14: मल्टीपल शॉट्स दरम्यान हॉरिझॉन्टल रिकॉइल कमी करण्यात आला आहे. फायरिंग दरम्यान रिकॉइल, मल्टीपल फायरिंग डॅमेज आणि बेस डॅमेज वाढवण्यात आला आहे.

PUBG 2.2 अपडेट साइज

अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर पबजीच्या नवीन अपडेटची साइज 681 MB असेल. तसेच iOS डिवाइसेससाठी 1.91 GB साइज असेल. युजर्सना नवीन अपडेट फोनमध्ये इस्टॉल करण्यासाठी स्टोरेजची काळजी घ्यावी लागेल. पबजी गेमची APK फाईल ऑफिशियल वेबसाइटवर कॉम्पेक्ट आणि रेग्युलर अशा दोन साईजमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: एक-दोन नव्हे तर 10 इलेक्ट्रिक टू व्हीलर लाँच करणार Honda; EV सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ

नोट: PUBG Mobile गेम सप्टेंबर 2020 मध्ये भारत सरकारनं बॅन केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी या गेमच्या इंडियन व्हर्जन BGMI वर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा गेम डाउनलोड करणे आणि खेळणे टाळावे, असा सल्ला भारतीय वाचकांना दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here