Oppo ने अलीकडेच F11 Pro सोबत Oppo A5 ची किंमत पण कमी केली होती. आता समोर आलेल्या माहिती नुसार कंपनीने आपल्या इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट असलेल्या Oppo K1 ची किंमत कमी केली आहे. लॉन्च नंतर या हँडसेटची किंमत पहिल्यांदा कमी करण्यात आली आहे.
दमदार स्पेसिफिकेशन्स सोबतच ओपो ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि वॉटरड्रॉप नॉच सारख्या शानदार फीचर्स ने सुसज्ज केला आहे. कंपनीने हा फोन 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. पण आता 2,000 रुपयांच्या कपातीनंतर हा 14,990 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. हँडसेट नवीन किंमतीत एक्सक्लूसिव फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध आहे.
ऑफर्स
फ्लिपकार्ट वर हा फोन 14,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच या फोन वर 13,570 रुपत्यांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. इतकेच नव्हे तर जर तुम्ही ऍक्सिस बँकेचे कार्ड होल्डर असाल तर तुम्हाला 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट पण मिळू शकतो.
Oppo K1 चे स्पेसिफिकेशन्स
Oppo K1 कपंनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड स्क्रीनला सपोर्ट करतो. ओपो ने हा फोन एंडरॉयड 8.1 आधारित कलर ओएस 5.2 वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 512जीपीयू देण्यात आला आहे.
Oppo K1 4जीबी रॅम सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. वेरिएंटची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड च्या माध्यमातून वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo K1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Oppo K1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या डिस्प्ले वर इनविजिबल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर Oppo K1 ची मोठी खासियत आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 3,600एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Oppo K1 पियानो ब्लॅक आणि अस्ट्रर ब्लू रंगांत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.
