Home बातम्या OPPO K11 5G ची लाँच डेट समजली; ट्रिपल कॅमेऱ्यासह डिजाईनचा देखील खुलासा

OPPO K11 5G ची लाँच डेट समजली; ट्रिपल कॅमेऱ्यासह डिजाईनचा देखील खुलासा

Highlights
  • OPPO च्या नव्या के सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप कॅमेरा दिला जाईल.
  • आगामी Oppo K11 5G दोन कलर ऑप्शनमध्ये येईल.
  • फोनमध्ये Snapdragon 782G चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.

OPPO नं अखेरीस आपल्या आगामी Oppo K11 5G ची लाँच डेट सांगितली आहे. के सीरिजमधील पुढील फोन चीनमध्ये 25 जुलैला दाखल होईल. कंपनीनं टीज केलेल्या डिजाईननुसार फोनमध्ये फ्लॅट फ्रेम मिळेल. तसेच रियर पॅनल देखील फ्लॅट आणि टोकाला थोडासा कर्व असेल. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा देखील दिसला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये येईल, असं देखील कंपनीनं सांगितलं आहे. चला जाणून घेऊया OPPO K11 5G चे लाँच डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्स.

OPPO K11 5G लाँच डिटेल्स

OPPO K11 5G कंपनीचा नवा मिड-रेंज स्मार्टफोन असेल. डिवाइसमध्ये फ्लॅगशिप सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. कंपनीनं सांगितलं आहे की आगामी के11 5जी मध्ये Sony IMX890 सेन्सर दिला जाईल. कंपनीनं फोनची डिजाईन देखील दाखवली आहे. मागील पॅनल ड्युअल टोन डिजाईनसह दिसत आहे, ज्यात कॅमेरा रिंगच्या बाजूला ग्रेडियंट कलर दिसत आहे. उजवीकडे व्हॉल्युम आणि पावर बटन आहे.

OPPO K11 स्पेसिफिकेशन्स (लीक)