OPPO K11 5G ची लाँच डेट समजली; ट्रिपल कॅमेऱ्यासह डिजाईनचा देखील खुलासा

Highlights

 • OPPO च्या नव्या के सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप कॅमेरा दिला जाईल.
 • आगामी Oppo K11 5G दोन कलर ऑप्शनमध्ये येईल.
 • फोनमध्ये Snapdragon 782G चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.

OPPO नं अखेरीस आपल्या आगामी Oppo K11 5G ची लाँच डेट सांगितली आहे. के सीरिजमधील पुढील फोन चीनमध्ये 25 जुलैला दाखल होईल. कंपनीनं टीज केलेल्या डिजाईननुसार फोनमध्ये फ्लॅट फ्रेम मिळेल. तसेच रियर पॅनल देखील फ्लॅट आणि टोकाला थोडासा कर्व असेल. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा देखील दिसला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये येईल, असं देखील कंपनीनं सांगितलं आहे. चला जाणून घेऊया OPPO K11 5G चे लाँच डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्स.

OPPO K11 5G लाँच डिटेल्स

OPPO K11 5G कंपनीचा नवा मिड-रेंज स्मार्टफोन असेल. डिवाइसमध्ये फ्लॅगशिप सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. कंपनीनं सांगितलं आहे की आगामी के11 5जी मध्ये Sony IMX890 सेन्सर दिला जाईल. कंपनीनं फोनची डिजाईन देखील दाखवली आहे. मागील पॅनल ड्युअल टोन डिजाईनसह दिसत आहे, ज्यात कॅमेरा रिंगच्या बाजूला ग्रेडियंट कलर दिसत आहे. उजवीकडे व्हॉल्युम आणि पावर बटन आहे.

OPPO K11 स्पेसिफिकेशन्स (लीक)

 • 6.7″ AMOLED 120Hz display
 • Qualcomm Snapdragon 782G
 • 50MP Rear Camera
 • 16MP Selfie Camera
 • 5,000mAh Battery
 • 100W fast charging
 • स्क्रीन : ओप्पो के11 स्मार्टफोनबाबत बातमी आली आहे की ह्यात 6.7 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो.
 • प्रोसेसर : लीक्सनुसार OPPO K11 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782जी ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जो 2.7गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालेल.
 • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो.
 • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO K11 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे.
 • फास्ट चार्जिंग : लीकनुसार ओप्पो आपला हा नवीन फोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आणेल जी फोन काही मिनिटांत फुल चार्ज करू शकते.
 • बॅटरी : OPPO K11 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमधून समोर आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here