ओप्पोने आपल्या K-सीरीजच्या प्रोडक्ट पोर्टफोलियोला पुढे वाढवत नवीन OPPO K12x 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. डिव्हाईसमध्ये कंपनीने 45 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगसह 5100mAh बॅटरी, डस्ट आणि स्प्लॅश प्रूफ IP54 रेटिंग, 360 डिग्री डॅमेज प्रूफ बॉडी, 7.68mm अल्ट्रा थिन डिझाईन सारखे अनेक वैशिष्ट्ये दिले आहेत. चला, पुढे मोबाईलचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.
OPPO K12x 5G ची किंमत
- ओप्पोने भारतात आपल्या नवीन स्मार्टफोन K12x 5G ला दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये एंट्री दिली आहे.
- OPPO K12x 5G च्या 6GB रॅम +128 जीबी व्हेरिएंटची किंमत मात्र 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
- डिव्हाईसचा मोठा मेमरी ऑप्शन 8GB रॅम +256 जीबी स्टोरेज 15,999 रुपयांना आहे.
- ओप्पोच्या नवीन फोनची सेल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, कंपनी वेबसाईट आणि इतर रिटेल आऊटलेटवर येत्या 2 ऑगस्टपासून सुरु होईल.
- OPPO K12x 5G साठी युजर्सना ब्रीज ब्लू आणि मिडनाईट वॉलेट सारखे दोन कलर ऑप्शन मिळतील.
- लाँच ऑफर पाहता कंपनी फोनवर 1,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट देत आहे. हा डिस्काऊंट स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकवर मिळेल. त्याचबरोबर नो कॉस्ट EMI चा ऑप्शन पण उपलब्ध होईल.
OPPO K12x 5G चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले
- 6.67 इंचाचा HD+ डिस्प्ले
- 120Hz रिफ्रेश रेट
OPPO K12x 5G मध्ये 6.67 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स पीक ब्राईटनेस आणि हाय रिजॉल्यूशन सादर करण्यात आले आहे.
परफॉर्मन्स
- डायमेंसिटी 6300 प्रोसेसर
- 6 नॅनोमीटर प्रक्रिया
फोनला चालवण्यासाठी डिव्हाईसमध्ये दमदार मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे. हा 6 नॅनोमीटर प्रक्रियावर चालतो. ज्याला जबरदस्त 5G स्पीड मिळते. तसेच इतर ऑपरेशन सुरळीतपणे करता येते.
स्टोरेज
- 8GB रॅम
- 256GB स्टोरेज
ओप्पोचा नवीन K12x 5G मोबाईल 8GB पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह आला आहे. त्याचबरोबर युजर्सना रॅमचा विस्तार करण्याचा फिचर मिळतो. ज्यामुळे जवळपास 16GB पर्यंत रॅमचा पावर वापर केला जाऊ शकतो.
कॅमेरा
- 32MP मुख्य कॅमेरा
- 2MP सेन्सर
- 8MP फ्रंट कॅमेरा
कॅमेरा फिचर्स पाहता हा डिव्हाईस ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह आहे. ज्यात 32MP अल्ट्रा-क्लियर AF मेन GC32E2 सेन्सर आणि सेकंडरी 2MP पोर्ट्रेट कॅमेरा GC02M1B सेन्सर आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाईसमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
बॅटरी
- 5100mAh बॅटरी
- 45W सुपरवूक चार्जिंग
पावर बॅकअपसाठी OPPO K12x 5G मध्ये कंपनीने 5100mAh ची मोठी बॅटरी प्रदान केली आहे. ज्यामुळे हा जास्त वेळाचा बॅकअप देतो ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी ब्रँडद्वारे 45 वॉट सुपरवूक चार्जिंगची सुविधा दिली आहे.
इतर फिचर्स
- 360 डिग्री डॅमेज प्रूफ आर्मर बॉडी
- IP54 रेटिंग
इतर फिचर्स पाहता डिव्हाईसमध्ये युजर्सना आयपी 54 रेटिंग देण्यात आली आहे. जी याला पाणी आणि धूळीपासून वाचवते. त्याचबरोबर कंपनीने 360 डिग्री डॅमेज प्रूफ बॉडीचा वापर केला आहे. फोनमध्ये ड्युअल सिम 5G, वाय-फाय, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक पर्याय आहेत. हेच नाही तर डिव्हाईस AI लिंक बूस्ट टेक्नॉलॉजीसह येतो. ज्याच्या मदतीने लो नेटवर्क कव्हरेज भागामध्ये पण तुम्हाला चांगले नेटवर्क मिळेल.
ऑपरेटिंग सिस्टम
- अँड्रॉईड 14
- कलर ओएस 14
ऑपरेटिंग सिस्टम पाहता OPPO K12x 5G स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित कलर OS 14 वर चालतो.















