Home बातम्या OPPO नं लाँच केला Reno 10 सीरीजचा लिमिटेड एडिशन फोन, पाहा फीचर्स आणि प्राइस

OPPO नं लाँच केला Reno 10 सीरीजचा लिमिटेड एडिशन फोन, पाहा फीचर्स आणि प्राइस

Highlights
  • OPPO Reno 10 Pro Star Sound Edition चीनमध्ये सादर झाला आहे.
  • ह्यात सोन्याच्या धाग्याची लाइनिंग आणि मॅट ग्रेडिएंट इफेक्ट देण्यात आला आहे.
  • हा 3,899 युआन म्हणजे सुमारे 44,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

मोबाइल निर्माता Oppo ची ओप्पो रेनो 10 सीरीज चीनमध्ये लाँच झाली आहे जी भारतीय बाजारात देखील येत आहे. ही सीरीज येत्या काही दिवसांत लाँच होणार आहे. आता कंपनीनं ह्या सीरीज अंतगर्त चीनमध्ये नवीन लिमिटेड एडिशन स्मार्टफोन OPPO Reno 10 Pro Star Sound Edition सादर केला आहे. चला जाणून घेऊया ह्याचे फीचर्स आणि किंमत किती ठेवण्यात आली आहे.

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशन

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशन फोनची खासियत म्हणजे ह्यात सोन्याच्या धाग्यांची लाइनिंग आणि मॅट ग्रेडिएंट इफेक्ट देण्यात आला आहे ज्यामुळे फिंगरप्रिंटचे डाग दिसत नाहीत. डिवाइसमध्ये नेब्युला अ‍ॅम्बिएंट लाइट देखील आहे. जी कस्टम थीमसह येते. स्मार्टफोनमध्ये 41 स्वदेशी अ‍ॅप्स देखील आहेत. याव्यतिरिक्त डिजाइन रेनो 10 सीरीजच्या प्रो मॉडेलसारखीच प्रमाणेच आहे.

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशनची किंमत

हा स्पेशल एडिशन फोन असल्यामुळे कंपनीनं कमी प्रमाणात बनवला आहे. हा डिवाइस 3,899 युआन म्हणजे सुमारे 44,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. फोनची विक्री चीनमध्ये JD.com वर केली जाईल.

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशनचे स्पेसिफिकेशन्स