OPPO नं लाँच केला Reno 10 सीरीजचा लिमिटेड एडिशन फोन, पाहा फीचर्स आणि प्राइस

Highlights

  • OPPO Reno 10 Pro Star Sound Edition चीनमध्ये सादर झाला आहे.
  • ह्यात सोन्याच्या धाग्याची लाइनिंग आणि मॅट ग्रेडिएंट इफेक्ट देण्यात आला आहे.
  • हा 3,899 युआन म्हणजे सुमारे 44,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

मोबाइल निर्माता Oppo ची ओप्पो रेनो 10 सीरीज चीनमध्ये लाँच झाली आहे जी भारतीय बाजारात देखील येत आहे. ही सीरीज येत्या काही दिवसांत लाँच होणार आहे. आता कंपनीनं ह्या सीरीज अंतगर्त चीनमध्ये नवीन लिमिटेड एडिशन स्मार्टफोन OPPO Reno 10 Pro Star Sound Edition सादर केला आहे. चला जाणून घेऊया ह्याचे फीचर्स आणि किंमत किती ठेवण्यात आली आहे.

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशन

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशन फोनची खासियत म्हणजे ह्यात सोन्याच्या धाग्यांची लाइनिंग आणि मॅट ग्रेडिएंट इफेक्ट देण्यात आला आहे ज्यामुळे फिंगरप्रिंटचे डाग दिसत नाहीत. डिवाइसमध्ये नेब्युला अ‍ॅम्बिएंट लाइट देखील आहे. जी कस्टम थीमसह येते. स्मार्टफोनमध्ये 41 स्वदेशी अ‍ॅप्स देखील आहेत. याव्यतिरिक्त डिजाइन रेनो 10 सीरीजच्या प्रो मॉडेलसारखीच प्रमाणेच आहे.

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशनची किंमत

हा स्पेशल एडिशन फोन असल्यामुळे कंपनीनं कमी प्रमाणात बनवला आहे. हा डिवाइस 3,899 युआन म्हणजे सुमारे 44,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. फोनची विक्री चीनमध्ये JD.com वर केली जाईल.

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशनचे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: ओप्पोचा नवीन लिमिटेड एडिशन फोन 6.7 इंचाच्या डिस्प्लेसह येतो. ह्यात 2412 × 1080 पिक्सेल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जातो. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
  • प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो परफॉर्मन्ससाठी दमदार आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन मिळतो.
  • बॅटरी: डिवाइसमध्ये दीर्घकाळ टिकणारी 4,600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्यात 100W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.
  • कॅमेरा: ओप्पो रेनो 10 प्रो लिमिटेड एडिशन मध्ये 1/2.74-इंचाच्या सेन्सरसह 32MP सुपर-लाइट आणि शॅडो टेलीफोटो लेन्स आहे. ह्यात f/2.0 अपर्चर आणि फोकल लेंथ 47mm आहे.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन ColorOS सुपरकंप्यूटिंग प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ज्यामुळे मेमरी अ‍ॅक्सेस परफॉर्मन्स आणि डेटा ट्रांसमिशन 16 पट वेगवान होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here