इंडियन स्मार्टफोन बाजाराच्या लो बजेट सेग्मेंट मध्ये चांगले स्थान बनवलेल्या टेक कंपनी पॅनासोनिक ने आज अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. पॅनासोनिक इंडियाने हा स्मार्टफोन एलुगा सीरीज अंतर्गत आणला आहे जो एलुगा रे 800 नावाने बाजारात सेल साठी उपलब्ध होईल. पॅनासोनिक एलुगा रे 800 पण कंपनी द्वारा लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. मजबूत बिल्ड क्वॉलिटी असलेला हा स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये आजपासूनच सेल साठी उपलब्ध होईल.
पॅनासोनिक एलुगा रे 800
पॅनासोनिक एलुगा रे 800 मेटालिक बॉडी वर बनला आहे जो फोनला मजबूत बनवतो. एलुगा रे 800 नॉच ट्रेंड पेक्ष्या वेगळ्या बेजल लेस डिजाईन वर बनवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5.5-इंचाचा फुलएचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. पॅनासोनिक एलुगा रे 800 एंडरॉयड 7.0 ओएस वर सादर केला गेला आहे, जो सध्या खूप जुना झाला आहे. तसेच हा फोन 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. कपंनी ने सध्या चिपसेटची माहिती दिली नाही.
शाओमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त फोन रेडमी 7, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट
एलुगा रे 800 पॅनासोनिक ने 4जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलुगा रे 800 फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.
पॅनासोनिक एलुगा रे 800 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन ओटीजी सपोर्ट सह 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. पॅनासोनिक एलुगा रे 800 मध्ये ब्लूटूथ, वाईफाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. पॅनासोनिक एलुगा रे 800 गोल्ड कलर मध्ये 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
रियलमी 3 विरुद्ध रेडमी नोट 7, बघा कोणता फोन विकत घेणे असेल फायद्याचे
पंकज राणा, बिजनेस हेड – पॅनासोनिक इंडिया म्हणतात, ‘‘ एलुगा रे 800 ने आम्ही पॅनासोनिकच्या स्मार्टफोन सिरीजची वाढ करत आहोत. हाई डेफेनेशन डिस्प्ले, स्टाईलिश लुक आणि पावर फुल बॅटरी लाइफ सह हा फोन सामान्य ग्राहकांचा वापर सोप्पा करेल. शानदार स्पेसिफिकेशन्स सोबत कंपनी ने हा फोन किफायती किंमतीत उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.’’
